Menu Close

माल्मो (स्विडन) येथे कुराण जाळल्यामुळे शरणार्थी धर्मांधांकडून हिंसाचार

  • धर्मांध कुठल्याही देशात असोत, ते त्यांच्या धर्माचा अवमान झाल्यावर वैध मार्गाने संबंधिताला शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करत नाहीत, तर थेट रस्त्यावर उतरून कायदा हातात घेतात आणि जनतेच्या अन् देशाच्या संपत्तीची हानी करतात ! याउलट हिंदू त्यांच्या धर्माचा अवमान झाल्यावर एकतर विरोध करत नाहीत आणि केला तर पोलिसांत एखादे निवेदन देतात, तरीही हिंदूंनाच अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा डोस पाजण्यात येतो !
  • ‘धर्मांधांची ही हिंसक मानसिकता पालटण्याचा कठोर प्रयत्न चीन करत आहे अन् तो योग्यच आहे’, असे कुणाला वाटल्यास चुकीचे काय ?
  • भारतात कित्येक वेळा उघडपणे पुरो(अधो)गामी आणि निधर्मीवादी यांच्याकडून ‘मनुस्मृति’ जाळण्यात आली अन् आजही जाळण्यात येत आहे; मात्र हिंदूंनी कधीही कायदा हातात घेतला नाही, हे लक्षात घ्या !

माल्मो (स्विडन)  :  येथे २८ ऑगस्टच्या रात्री धर्मांधांनी रस्त्यावर उतरून ‘अल्ला हु अकबर’ अशी घोषणाबाजी करत हिंसाचार केला. या वेळी जाळपोळ करण्यात आली, तसेच पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. ३०० हून अधिक धर्मांधांचा जमाव रस्त्यावर उतरला होता. डेन्मार्कचे नेते रसमस पालुडान यांना अटक करण्यात आल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी येथील एका चौकात कुराण पायाखाली तुडवल्याची आणि नंतर जाळल्याची बातमी पसरली. त्यानंतर धर्मांधांकडून हिंसाचार करण्यात आला. हिंसाचार करणारे बहुतेक धर्मांध हे मध्य-पूर्वेतून आलेले शरणार्थी आहेत. (संपूर्ण युरोपमध्ये आता शरणार्थी धर्मांध डोईजड होऊ लागले आहेत, त्याचेच हे एक उदाहरण होय ! यापूर्वी जर्मनीसह अनेक युरोपीय देशांनी ते भोगले आहे आणि आता स्विडन तो अनुभव घेत आहे. यावरून ‘धर्मांध कुठेही असले, तरी ते समाजासाठी त्रासदायकच असतात’, हे स्पष्ट होते ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

युरोपमधील देशांच्या इस्लामीकरणाच्या विरोधातील बैठकीला अनुमती नाकारल्याने कुराण जाळले !

१. ‘नॉर्डिक’ देशांचे (फिनलँड, डेन्मार्क, आईसलँड, नॉर्वे आणि स्विडन या देशांचे) इस्लामीकरण’ या विषयावर माल्मो येथे बैठक आयोजित करण्यात आली होती.

यात स्विडनने बंदी घातलेल्या डेन्मार्कच्या ‘स्ट्रॅम कुर्स’ पक्षाचे नेते आणि अधिवक्ता रसमस पालुडान सहभागी होणार होते. या बैठकीला अनुमती नाकारली होती. यामुळे पालुडान स्विडनमध्ये येत असतांना त्यांना स्विडनच्या सीमेवरच रोखण्यात आले. स्विडनच्या प्रशासनाला शंका होती की, पालुडान यांना देशात येण्याची अनुमती दिली, तर येथे कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती बिघडू शकते. त्यामुळे पालुडान यांना अटक करण्यात आली.

२. पालुडान यांच्या अटकेमुळे संतप्त झालेल्या त्यांच्या समर्थकांनी जाहीररित्या कुराण जाळले. या प्रकरणी ३ जणांना अटक करण्यात आली आहे. (आक्षेपार्ह कृती करणार्‍यांवर पोलिसांनी कारवाई केली असतांनाही धर्मांधांना हिंसाचार करून काय दाखवायचे असते ? याचा विचार केला पाहिजे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) पालुडान यांनी गेल्या वर्षी मुसलमानांना वर्ज्य असणार्‍या डुकराच्या मांसामध्ये कुराण ठेवून ते जाळले होते. फेसबूकवरही त्यांच्याकडून याविषयी पोस्ट करण्यात येत होती.

डेन्मार्कमधील शरणार्थी मुसलमानांना हाकलून लावण्याचे धोरण अवलंबण्याचा प्रयत्न

पालुडान हे डेन्मार्कमध्ये गतवर्षी झालेल्या निवडणुकांमध्ये अत्यल्प मतांनी हरले. त्यांनी डेन्मार्कमध्ये शरण घेतलेल्या ३ लाख मुसलमान शरणार्थींना हाकलून लावण्याचे आणि देशामध्ये इस्लामवर बंदी घालण्याचे धोरण अवलंबणार असल्याचे निवडणुकांच्या वेळी घोषित केले होते.

इस्लामविरोधी पोस्टमुळे ३ मासांची शिक्षा भोगलेले पालुडान

जूनमध्ये पालुडान यांना त्यांच्या पक्षाच्या सामाजिक माध्यमातून इस्लामविरोधी व्हिडिओ पोस्ट करून द्वेष पसरवल्याच्या आरोपाखाली दोषी ठरवण्यात आले होते. त्यांना ३ मासांची कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. वर्ष २०१९ मध्ये त्यांना वर्णद्वेषी भाषण केल्यावरून १४ दिवसांच्या सशर्त कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती, तसेच विविध प्रकरणांत दोषी आढळल्याने त्यांना एक मासाची कारावासाची शिक्षाही करण्यात आली होती.

माझ्यावर बंदी घातली जाते, तर बलात्कारी आणि हत्यारे यांचे नेहमी स्वागत होते ! – पालुडान

रसमस पालुडान यांना डेन्मार्कच्या सीमेवर रोखल्यावर, तसेच त्यांना स्विडनमध्ये येण्यावर २ वर्षांची बंदी घातल्यावर त्यांनी यास विरोध केला. पालुडान यांनी फेसबूकवर पोस्ट लिहून म्हटले की, माझ्यावर स्विडनमध्ये येण्यावर २ वर्षांसाठी बंदी घातली जाते; मात्र बलात्कारी आणि हत्यारे यांचे नेहमीच स्वागत होते.’ गेल्या ५ वर्षांत मध्य-पूर्वेतून युरोपमध्ये येणारे धर्मांध तेथील युवतींवर अत्याचार करत असल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर पालुडान यांनी ही टीका केली आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *