Menu Close

‘आयआयटी इंदूर’मध्ये संस्कृत भाषेतून शिकवले जात आहे प्राचीन भारतीय विज्ञान !

  • जगभरातील ७५० हून विद्यार्थ्यांचा सहभाग
  • १५ दिवसांच्या विशेष ऑनलाईन ‘कोर्स’चे आयोजन

काँग्रेसींनी संस्कृत भाषेला ‘मृत भाषा’ ठरवल्यानेच प्राचीन ज्ञानापासून भारतीय आजही वंचित आहेत. जगातील सर्वांत प्राचीन असलेल्या संस्कृत भाषेचा तिच्या स्वगृही, म्हणजे भारतात अनेक दशकांपासून उपहास होणे, हे स्वातंत्र्यानंतरच्या आतापर्यंतच्या शासनकर्त्यांना लज्जास्पद ! विद्यमान केंद्र सरकारने आता संस्कृत भाषेला तिचे पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी पावले उचलावीत, अशी अपेक्षा !

इंदूर : ‘आयआयटी इंदूर’मध्ये संस्कृत भाषेतून प्राचीन भारतीय विज्ञान शिकवले जात आहे. यासाठी जगभरातील ७५० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. प्राचीन गणिततज्ञ भास्कराचार्य यांच्या ‘लीलावती’ या गणितावरील ग्रंथासह भारतातील अन्य प्राचीन वैज्ञानिक ग्रंथ संस्कृत भाषेत जाणून ते मूळ रूपात समजून घेण्यासाठी ‘आयआयटी इंदूर’ने १५ दिवसांचा विशेष ऑनलाईन ‘कोर्स’ चालू केला आहे. यामध्ये ‘आयआयटी मुंबई’ आणि ‘आयआयटी इंदूर’ येथील तज्ञ प्राध्यापक संस्कृतमधून ज्ञान देत आहेत. ‘आयआयटी इंदूर’च्या या ‘कोर्स’मधील अभ्यासक्रमात धातू विज्ञान, औषधी, रोपटी आदी विषयांचा समावेश असून हे सर्व ज्ञान संस्कृतमधून दिले जाते. विद्यार्थी वैज्ञानिक भाषेत या विषयांवरील ग्रंथांचे अध्ययन करू शकतात आणि प्राचीन भाषेत ते समजून घेऊ शकतात.

पुढे संस्कृत हीच एक भाषा असेल ! – प्रा. नीलेश कुमार जैन

‘आयआयटी इंदूर’चे कार्यवाहक निदेशक प्रा. नीलेश कुमार जैन यांनी या उपक्रमाचे उद्घाटन केले. ते म्हणाले, ‘‘संस्कृत ही एक प्राचीन भाषा आहे, जी सध्या कृत्रिम बुद्धीमत्तेत तिचे स्थान शोधत आहे. पुढे हीच एक भाषा असेल. या उपक्रमाच्या माध्यमातून लोकांना संस्कृतशी जोडतांना आम्हाला फार आनंद होत आहे. आम्ही हौस म्हणून हा उपक्रम चालू केला नसून असे उपक्रम राबवणे, ही आजच्या काळाची आवश्यकता आहे.’’

संस्कृतचे जतन आणि संवर्धन करणे अत्यावश्यक ! – प्रा. गंती एस्. मूर्ती

या उपक्रमाचे समन्वयक प्रा. गंती एस्. मूर्ती म्हणाले, ‘‘कृषी, गणित, धातू, खगोल, चिकित्सा आदी विषयांवरील ग्रंथांचे लिखाण हे संस्कृतमधून आहे. त्यामुळे या ग्रंथांचे अध्ययन करण्यासाठी प्रथम संस्कृत येणे अनिवार्य आहे. संस्कृत भाषेच्या समृद्ध वारशाचे जतन आणि त्याचे संवर्धन करणे अत्यावश्यक आहे.’

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *