- इस्लामविरोधकांनी कुराणाची पाने फाडली !
- ‘भाजप, रा.स्व. संघ, विहिंप आदी हिंदुत्वनिष्ठ संघटना इस्लामविरोधी आहेत’, असे म्हणणारे भारतातील तथाकथित पुरो(अधो)गामी आणि निधर्मीवादी युरोपमध्ये या संघटना नसतांना तेथे इस्लामचा विरोध का होत आहे ?, याचा अभ्यास करतील का ?
- मध्य-पूर्वेतून युरोपमध्ये गेलेले शरणार्थी धर्मांध आता त्यांचे मूळ जिहादी रूप दाखवू लागल्याने तेथील ख्रिस्ती जनतेला ते असह्य होऊ लागल्यानेच ते आता याविरोधात रस्त्यावर उतरून विरोध करू लागले आहेत, हेच या घटनांतून लक्षात येते !
ऑस्लो (नार्वे) – युरोपमधील स्विडनमधील माल्मो शहरात कुराण फाडल्याच्या विरोधात धर्मांधांनी केलेल्या हिंसाचारानंतर दुसर्या दिवशी म्हणजे २९ ऑगस्ट या दिवशी नॉर्वेची राजधानी ऑस्लो येथेही इस्लामचा विरोध करणारे आणि धर्मांध यांच्यात जोरदार हाणामारी झाली. या वेळी इस्लामविरोधकांनी कुराणाची पाने फाडली.
१. नॉर्वेमधील राष्ट्रवादी संघटना ‘स्टॉप इस्लामायइजेशन ऑफ नार्वे’ (एस्.आय.एन्.) हिने संसदेबाहेर निदर्शने आयोजित केली होती. त्यात त्यांच्याकडून इस्लामी विचारसरणीचा विरोध करण्यात येत होता. ही निदर्शने जवळपास २ घंटे चालू होती. या संघटनेचे नेते लार्स थोर्सन यांनी या वेळी इस्लामविरोधी विधाने केली. तसेच महंमद पैगंबर यांच्याविषयी विधाने केली.
२. या निदर्शनांच्या विरोधात धर्मांधही तेथे जमा झाले. थोर्सन यांची विधाने धर्मांधांना अनुचित वाटल्याने या निदर्शनांच्या विरोधात घोषणाबाजी चालू केली. तेव्हा पोलिसांनी त्यांना रोखले. या वेळी दोन्ही गट एकमेकांच्या दूर होते.
३. याच वेळी एस्.आय.एन्.च्या एका सदस्याने कुराणाची प्रत काढून त्याची पाने फाडली. ही घटना धर्मांधांनी पाहिल्यावर त्यांनी आक्रमक होऊन विरोध करणे चालू केले. तसेच त्यांनी पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्स दूर करत एस्.आय.एन्.च्या कार्यकर्त्यांना जाऊन मारहाण करू लागले. त्या वेळी दोन्ही गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या वेळी पोलिसांनी कारवाई करत त्यांना पांगवले. यात एक जण घायाळ झाला. पोलिसांनी दोन्ही गटांतील अनेकांना अटक केली आहे.