हिंदूंनो, या यशाविषयी भगवान श्रीकृष्णाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करा. समस्त हिंदूंनी अशाच प्रकारे संघटित होऊन वैध मार्गाने विरोध केल्यास समाजात होणारी धर्महानी सहज रोखली जाईल !
मुंबई : गणेशोत्सवाच्या काळात विविध माध्यमांतून होणारा श्री गणेशाचा अवमान रोखण्यात हिंदु जनजागृती समितीला यश मिळाले. फ्लिपकार्ट, मॅकडोनाल्ड, आणि मध्यप्रदेश सायबर पोलीस यांनी चित्राच्या माध्यमातून केलेला श्री गणेशाचा अवमान हिंदूंनी केलेल्या संघटित वैध विरोधामुळे रोखला गेला.
नुकत्याच झालेल्या गणेशोत्सवात अनेक आस्थापनांनी त्यांच्या आर्थिक लाभाच्या स्वार्थी हेतूने चित्रांच्या माध्यमातून श्री गणेशाचे विडंबन करून गणेशाचा घोर अवमान केला. यंदाच्या वर्षीही काही धर्मप्रेमींनी या गोष्टी हिंदु जनजागृती समितीच्या निदर्शनास आणून दिल्या. यावर समितीने तिचे संकेतस्थळ आणि सामाजिक माध्यमे यांच्या मध्यमातून हिंदूंना यास वैध र्मार्गाने विरोध करण्याचे आवाहन केले. परिणामी फ्लिपकार्ट, मॅकडोनाल्ड, आणि मध्यप्रदेश सायबर पोलीस यांना श्री गणेशाचे विडंबनात्मक चित्र हटवावे लागले.
समितीला लाभलेले यश
१. फ्लिपकार्ट
‘ई-कॉमर्स’ संकेतस्थळ असलेल्या फ्लिपकार्टने गणेशोत्सवानिमित्त भ्रमणभाषच्या अॅपवर फेडरल बँकेवर सूट देणारे विज्ञापन करतांना श्री गणेशाने त्याच्या सोंडेत भ्रमणभाष पकडल्याचे चित्र दाखवले होत. हिंदु जनजागृती समितीने टि्वटरद्वारे केलेल्या विरोधामुळे काही घंट्यांतच हे चित्र काढून टाकण्यात आले.
२. मॅकडोनाल्ड
मॅकडोनाल्डने त्याचा ‘फ्रेंच फ्राईज्’ हा पदार्थ श्री गणेशाच्या रूपात दाखवणारे चित्र इंस्टाग्राम आणि फेसबूक यांवर पोस्ट केले होते. हिंदूंनी केलेल्या विरोधानंतर मॅकडोनाल्डने या दोन्ही पोस्ट हटवल्या.
३. मध्यप्रदेश सायबर पोलीस
मध्यप्रदेशच्या सायबर पोलिसांनी चित्रात श्री गणेशाचे मानवीकरण करून त्याच्या मुखावर गोपनीय माहितीविषयी प्रबोधन करणारे वाक्य लिहिलेले दाखवले होते. यास हिंदु जनजागृती समितीसह अन्य धर्मप्रेमींनी टि्वटरद्वारे विरोध करत हे चित्र हटवण्याची मागणी केली. यानंतर पोलिसांनी हे ट्वीट पुसून (डिलिट) केले.