गोळीबारात पत्नी आणि मुलगी घायाळ
अन्य राज्यांच्या तुलनेत भाजपच्या राज्यांत हिंदुत्वनिष्ठ आणि हिंदु संत यांच्या हत्या होण्याच्या घटना अधिक घडतात, असे दिसून येते. भाजपच्या राज्यात तरी हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या रोखल्या जातील आणि आक्रमणकर्त्यांवर कडक कारवाई होईल, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !
इंदूर (मध्यप्रदेश) : मध्यप्रदेशमधील शिवसेनेचे माजी राज्यप्रमुख रमेश साहू यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. साहू यांच्यावर गोळीबार केल्यावर त्यांना वाचवण्यासाठी आलेली त्यांची पत्नी आणि मुलगी घायाळ झाले. आरोपींनी गोळ्या झाडल्यानंतर पलायन केले. ही घटना १ सप्टेंबरच्या मध्यरात्री उमरीखेडा येथे त्यांच्या ढाब्यावर घडली. सकाळी ढाब्यावरील कर्मचारी तेथे पोचल्यावर ही घटना समोर आली. घटनास्थळावरून कोणतीही वस्तू चोरीला गेलेली नसून आरोपी केवळ साहू यांची हत्या करून पसार झाले. त्यामुळे या हत्येमागे जुना वाद असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
साहू हे १० वर्षांपेक्षा अधिक काळ शिवसेनेचे मध्यप्रदेश प्रदेशाध्यक्ष होते. त्यांंच्यावर इंदूरमधील २ पोलीस ठाण्यांत २ गुन्हे नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे आपसांतील वादातून ही हत्या केली गेल्याचा संशय पोलिसांना आहे. सध्या पोलीस परिसरातील सीसीटीव्ही ‘फूटेज्’ची तपासणी करत आहेत. पोलिसांनी ढाब्यावर कामाला असलेल्या कर्मचार्यांचीही चौकशी चालू केली आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात