Menu Close

गुन्हेगारी आणि उपाय !

प्रत्येक देशांमध्ये गुन्हे रोखण्यासाठी कायदे करण्यात आले आहेत. गुन्हेगारांना पकडण्यासाठी आणि त्यांना दंडित करण्यासाठी पोलीस आणि न्यायव्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. हे अनेक युगांपासूनच चालू आहे. म्हणजेच ‘चुका करणे हे मनुष्याच्या प्रकृतीमध्ये आहे’, असे म्हणावे लागेल. हिंदु धर्मशास्त्रानुसार सत्त्व, रज आणि तम असे तीन प्रमुख गुण आहेत. या गुणांच्या आधारे मनष्य त्याचे विचार आणि कर्म करत असतो. सात्त्विक व्यक्ती कधीही गुन्हे करण्याचा विचार करत नाही. त्यामुळे त्याच्याकडून तशी कृतीही होत नाही; मात्र रज आणि तम गुणी व्यक्ती गुन्हे करतात; कारण त्यांच्या मनामध्ये स्वार्थ असतो आणि इतरांना लुबाडून स्वतःचा स्वार्थ पूर्ण करण्याची इच्छा असते. या वृत्तीला धर्माच्या म्हणजे सध्याच्या काळातील पंथांच्या आधारे जोडून पहाता येणार नाही; मात्र कुठल्या पंथांमध्ये अशा प्रकारचे रज आणि तम प्रधानता असणार्‍या व्यक्तींमुळे अधिक गुन्हे केले जातात, कायदाद्रोही कृत्ये केली जातात, मनुष्य, प्राणी, निसर्ग यांच्या विरोधात कृती केली जाते, हे अभ्यासले, तर काही गोष्टी समोर येतात. यासाठी नॉर्वे देशाचा अभ्यास करता येईल. नॉर्वेने त्या देशात शरण घेतलेल्या मध्य-पूर्वेतील कट्टरतावादी मुसलमानांची हकालपट्टी केली. त्यामुळे तेथील गुन्हेगारीतील वर्षभराच्या प्रमाणामध्ये ३१ टक्क्यांची घट झाली. ही घट लक्षणीय म्हणता येईल.

प्रत्येक देश गुन्हेगारी रोखण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करत असतो. ‘त्या तुलनेत नॉर्वेने केलेली उपाययोजना अत्यंत अल्प खर्चात झालेली आहे’, असे म्हणावेसे वाटेल. मुळात नॉर्वेच नव्हे, तर संपूर्ण युरोप (पोलंड वगळता) कट्टरतावाद्यांच्या गुन्हेगारीमध्ये भरडला जाऊ लागला आहे. मध्य-पूर्वेत इस्लामिक स्टेटमध्ये झालेल्या यादवीमुळे तेथील लाखो मुसलमानांनी युरोपमध्ये पलायन करून तेथे शरण गेले. त्या वेळी काही देशांनी त्यांना स्वीकारण्यास नकार दिला; मात्र ‘मानवतेसाठी त्यांना स्वीकारायला हवे’, असा मतप्रवाह अधिक परिणामकारक ठरल्याने मुसलमानांना तेथे शरणागती देण्यात आली. यानंतर गेल्या ४ – ५ वर्षांतच तेथील गुन्हेगारीत प्रचंड वाढ झाली असून ती या मुसलमानांतील काही कट्टरतावाद्यांकडून केली जात असल्याचे लक्षात आले. याचा मग विरोधही होऊ लागला आहे. भविष्यात असे घडू शकते, हे लक्षात घेऊन पोलंडनेच आधीच मुसलमानांना त्यांच्या देशात शरण देण्यास नकार दिल्याने आज तेथील कायदा आणि सुव्यवस्था अन्य युरोपियन देशांच्या तुलनेत उत्तम आहे. पोलंडने आधीच घेतलेला निर्णय आणि नॉर्वेने नंतर घेतलेला निर्णय पहाता युरोपियन देशांना आता कळून चुकले असणार की, त्यांनी काय चूक केली आहे आणि ती सुधारण्यासाठी नेमके काय करायला हवे. ते ती चूक सुधारतील अशी अपेक्षा करता येईल; मात्र यातून एक लक्षात आले आहे की, कट्टरतावाद्यांमुळे किती सहन करावे लागते, हे त्यांच्या लक्षात आले आहे. हेच युरोपीयन देश भारताला मानवाधिकाराचे सल्ले देत असतात आणि धर्मांधांची बाजू घेत असतात. स्विडनमध्ये कुराण जाळण्यात आल्यानंतर धर्मांधांनी हिंसाचार केला. तेव्हा त्यांना या हिंसाचारावर मात कशी करायची याचा अनुभव नव्हता. त्यामुळे ते त्यांना जड गेले. याच स्विडनने भारताने काश्मीरविषयक कलम ३७० हटवल्यावर भारताला उपदेशाचे डोस पाजले होते आणि धर्मांध काश्मिरींची बाजू घेतली होती. आता त्याला धर्मांधांची मानसिकता लक्षात आली असेल.

धर्माधिष्ठित राज्य हवे !

युरोपमधील हा अनुभव पहाता भारतातील स्थिती लक्षात येते. भारतातील गुन्हेगारीत देशात अल्पसंख्यांक असणार्‍यांचे सर्वाधिक प्रमाण आहे, हे आकडेवारीतूनच लक्षात येते. तस्करी, हत्या, बलात्कार, खंडणी आदी गुन्ह्यांमध्ये धर्मांधांचीच नावे असतात. देशातील गुंडांच्या टोळ्याही यांच्याच आहेत. पूर्वी हाजी मस्तान, करीमलाला, दाऊद इब्राहिम, आतिक अहमद आदी कुख्यात गुंडांच्या टोळ्या होत्या आणि आहेत. जिहादी आतंकवाद याच अल्पसंख्यांकांचा आहे. यामुळे भारतच नव्हे, तर संपूर्ण जग त्रासलेले आहे. हिंदूंमध्ये किंवा अन्य धर्मियांमध्ये गुन्हेगारी नाही, असे म्हणता येत नसले, तरी लोकसंख्येच्या तुलनेत त्यांचे प्रमाण अल्पच आहे. म्हणूनच रज आणि तम प्रधान असणार्‍यांमध्ये गुन्हेगारी वृत्ती अधिक असते. काय, वाचा, मन यांद्वारे ते गुन्हे करत असतात. नॉर्वेत पूर्वी मुसलमान नव्हते. त्यामुळे गुन्हेगारी अल्प होती. कट्टरतावादी लोकांची संख्या वाढल्यावर त्यांनी त्यांना हाकलले. भारतातील गुन्हेगारी न्यून करण्यासाठी भारत अशा प्रकारचा निर्णय घेऊ शकत नाही; कारण गुन्हे करणारे भारतीयच आहेत. तर मग त्यावर उपयायोजना काढणेही आवश्यक आहे. चीन तेथील १० लाख उघूर मुसलमानांची कट्टरतावादी आणि गुन्हेगारी मानसिकताच पालटण्यासाठी कठोर प्रयत्न करत आहे. ते भारताला शक्य नाही. मग भारताने काय केले पाहिजे, असा प्रश्‍न निर्माण होतो. त्यासाठी सध्याच्या सरकारने समान नागरी कायदा, धर्मांतर विरोधी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा, गोहत्याबंदी कायदा संमत करून त्यांची कठोर कार्यवाही चालू केली पाहिजे. गुन्हेगारांवरील खटले जलद गतीने चालवून त्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी आणि शिक्षा भोगतांना त्यांच्यावर चांगले संस्कार करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. हे करून गुन्हेगारी काही प्रमाणात न्यून होऊ शकते, हेही तितेकच खरे आहे; कारण मुळात रज आणि तम प्रधान वृत्ती नष्ट झाली पाहिजे. यासाठी महाभारतात म्हटले आहे की, ‘राजा हा काळाला कारणीभूत असतो. राजा धर्माचरणी असेल, तर प्रजाही तशी असते.’ यामुळेच आपण रामराज्याची कल्पना सांगत असतो. असे रामराज्य येण्यासाठी तसा राजा असणे आवश्यक आहे. म्हणजे धर्माचरणी आणि संतांच्या आदेशाने राज्य करणारा राजा हवा. असे धर्माधिष्ठित राज्य आणण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करणे अनिवार्य आहे. याद्वारे धर्माचरणी शासनकर्ते मिळतील जे सत्त्वगुणी असतील आणि ते राज्यकारभार नीती आणि नियमाने करतील. त्यामुळे प्रजाही त्यानुसार वागेल. म्हणजेच प्रजाही सत्त्वगुणी असेल. रज आणि तम प्रधान असणार्‍यांना सत्त्वगुणी बनवण्यासाठी प्रयत्न केले जातील.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *