Menu Close

गणेशोत्सवाच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यात ठिकाठिकाणी घेण्यात आलेल्या प्रवचनांना उत्स्फूर्त प्रतिसाद !

कोल्हापूर : गणेशोत्सवाच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ठिकाठिकाणी घेण्यात आलेल्या प्रवचनांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या प्रवचनांमध्ये श्री गणेश चतुर्थीचे महत्त्व, या काळात नवीन मूर्ती का आणावी ?, श्री गणेशाच्या नामजपाचे महत्त्व, गणपतीचे मूर्तीविज्ञान, गणेशोत्सव चालू करण्यामागील लोकमान्य टिळकांचा उद्देश आणि सध्याची स्थिती, गणेश पूजनामागील अध्यात्मशास्त्र यांविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. समितीच्या कार्यकर्त्यांनी ‘ऑनलाईन’ मार्गदर्शन केले, तर मार्गदर्शनाला उपस्थित असणार्‍या जिज्ञासूंनी सामाजिक अंतर ठेवण्याच्या नियमाचे पालन केले.

१. लिंगनूर येथील न्यू सूर्यतेज मित्र मंडळ येथे अध्यक्ष श्री. राजू कुंभार यांसह अन्य गणेशभक्त उपस्थित होते आणि मत्तीवडे येथील शंभूराजे मित्रमंडळ येथे  येथे हिंदु जनजागृती समितीचे श्री. अमोल कुलकर्णी यांनी विषय मांडला. शंभूराजे मित्रमंडळ येथे मंडळाचे अध्यक्ष श्री. शिवाजी पोटले यांच्यासह ६० गणेशभक्तांची उपस्थिती होती.

२. हिंदु जनजागृती समितीचे श्री. किरण दुसे यांनी मौजे मत्तिवडे येथील ‘ओम गणेश तरुण मंडळ’ येथे प्रवचन घेतले. तेथे अध्यक्ष श्री. विलास केसरकर यांच्यासह १०० गणेशभक्तांची उपस्थिती होती. प्रवचनानंतर श्री. विलास केसरकर म्हणाले, ‘‘कार्यक्रम पुष्कळ आवडला. तुम्ही सांगिलेल्या धार्मिक कृती आम्ही आमच्या मंडळात करण्याचा प्रयत्न करत आहोत.’’ या प्रवचनाचे आयोजन करण्यात मंडळाचे सदस्य आणि धर्मप्रेमी श्री. संतोष जाधव यांनी पुढाकार घेतला.

३. निपाणी (कर्नाटक) येथे ‘एकदंताय तरुण मंडळ’ येथे हिंदु जनजागृती समितीचे श्री. किरण दुसे यांनी प्रवचन घेतले. तेथे ४४ जण उपस्थित होते. या संदर्भात मंडळाचे अध्यक्ष श्री. सतिश शिंदे म्हणाले, ‘‘प्रवचन सर्वांना आवडले. पुन्हा अशाच प्रकारचे कार्यक्रम आपण आयोजित करू.’’

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *