हिंदुविरोधी ‘फेसबूक’च्या दडपशाहीच्या विरोधात हिंदूंचा संघर्षाचा पवित्रा
भारतात अभिव्यक्ती स्वातंत्र्य असतांना ‘फेसबूक’ दडपशाही करत केवळ हिंदु कार्यकर्ते, तसेच हिंदु संघटना यांचे फेसबूक पेज बंद करत आहे. दुसरीकडे हिंसक कार्य करणारे आतंकवादी आणि त्यांच्या आतंकवादी संघटना यांची ‘फेसबूक पेजेस’ सर्रासपणे विखारी प्रचार करतच आहेत. हिंदुबहुल देशात हिंदूंचाच आवाज दाबण्याचा संतापजनक प्रकार ‘फेसबूक’ने आरंभला आहे. हिंदुविरोधी ‘फेसबूक’चा हा पक्षपात उघड करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने 6 सप्टेंबर 2020 या दिवशी रात्री 8.30 ते 9.30 या वेळेत ‘चर्चा हिंदु राष्ट्र की’ या विशेष परिसंवाद मालिकेत ‘फेसबूक का पक्षपात : हिंदुंआें के ‘पेज’ बंद, आतंकीयो के चालू !’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. तरी अधिकाधिक हिंदूंनी हा कार्यक्रम पहावा आणि ‘फेसबूक’च्या या पक्षपातीपणाचा निषेध करावा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीने केले आहे.
या ‘विशेष परिसंवादा’त ‘फेसबूक’ने नुकतेच ज्यांचे पेज बंद केले, ते भाजपचे तेलंगणा येथील आमदार आणि प्रखर हिंदुत्वनिष्ठ टी. राजासिंह, ‘सोशल मीडिया’चे अभ्यासक श्री. अभिनव खरे, सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता तथा ‘हिंदू फ्रंट फॉर जस्टीस’चे प्रवक्ता अधिवक्ता विष्णू शंकर जैन आणि सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस हे सहभागी होणार आहेत. हा कार्यक्रम हिंदु जनजागृती समितीच्या ‘हिंदुजागृती’ या ‘यू–ट्युब’ चॅनलद्वारे, तसेच www.hindujagruti.org संकेत स्थळावरून थेट प्रक्षेपित होणार आहे.
हा कार्यक्रम पाहण्यासाठीची लिंक :