Menu Close

फेसबुकचे पक्षपाती धोरण – हिंदुत्ववादी भाजप आमदार टी. राजासिंह यांच्या ‘फेसबूक पेज’वर बंदी !

…मग जिहाद समर्थक डॉ. झाकीर नाईक, अकबरुद्दीन ओवैसी यांच्यासारख्या धार्मिक द्वेष पसरवणार्‍यांच्या ‘फेसबूक पेज’वर बंदी का नाही ?

भाग्यनगर येथील भाजपचे आमदार आणि प्रखर हिंदुत्वनिष्ठ टी. राजासिंह यांच्या ‘फेसबूक पेज’वर बंदी घालून फेसबुकने भारतातील ‘भाषण स्वातंत्र्या’वरच मर्यादा घातली आहे. जर त्यांच्या पेजवरून द्वेष पसरवला जात होता, तर भारतात ‘वॉन्टेड’ असणार्‍या आणि मुसलमान युवकांना आतंकवादी बनण्यास प्रोत्साहित करणार्‍या जिहादी डॉ. झाकीर नाईक यांच्या, तसेच 100 कोटी हिंदूंना संपवण्याची उघड धमकी देणार्‍या ‘एमआयएम’चे आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांच्या ‘फेसबूक पेज’वर बंदी का घातलेली नाही ? अनेक जिहादी आतंकवादी संघटनांचे ‘फेसबुक पेज’ आजही जिहादचा प्रचार करत आहेत. त्यामुळे ‘फेसबूक’ भारतात मुसलमानांना एक आणि हिंदूंना वेगळा नियम लावून धार्मिक पक्षपातच करत असल्याचे मत हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी या प्रकरणी व्यक्त केले आहे. ‘फेसबूक’ने त्वरित टी. राजासिंह यांचे ‘फेसबूक पेज’ पूर्ववत चालू करावे, अन्यथा हिंदु समाजालाच फेसबूकवर बहिष्कार घालण्याचे आवाहन करावे लागेल, अशी चेतावनीही श्री. शिंदे यांनी या वेळी दिली.

देहली येथील तसेच नुकत्याच झालेल्या बेंगळुरु दंगलीच्या वेळीही धर्मांधांना एकत्र येण्याचे आवाहन ‘फेसबूक पेज’वरूनच करण्यात आल्याचे उघड झाले होते. भारतातील शहरांत दंगली पेटवणार्‍या ‘फेसबूक पेज’वर कोणतीही कारवाई ‘फेसबूक’ने केलेली दिसत नाही. तसेच ‘फेसबूक’वरून आजपर्यंत अनेक वेळा हिंदूंच्या देवता, राष्ट्रपुरुष यांच्या संदर्भात अश्‍लील आणि आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित केल्या जातात. याबाबत हिंदुत्ववादी संघटनांनी अनेकदा ‘फेसबूक’कडे अशा पोस्ट किंवा पेज बंद करण्याची विनंती केली; मात्र त्याविषयी ‘फेसबूक’ने कधीही कारवाई केलेली नाही, हा ‘फेसबूक’चा पक्षपातीपणाच आहे.

हिंदु जनजागृती समितीचे अधिकृत ‘पेज’ही अशाच प्रकारे वर्ष 2012 मध्ये कोणतेही कारण न देता ‘फेसबूक’ ने बंद केले होते. यातूनही ‘फेसबूक’चा हिंदुद्वेष स्पष्ट दिसतो. आमदार टी. राजासिंह हे जनप्रतिनिधी आहेत, त्यांचे ‘पेज’ बंद केल्याने सामान्य जनतेला त्यांच्याशी थेट संवाद साधून समस्या सोडवण्यावर मर्यादा येणार आहेत. त्यामुळे भारत सरकारने ‘फेसबूक’च्या या हिंदुविरोधी मुजोरीवर प्रतिबंध घालावा, अशी आमची केंद्र सरकारकडे मागणी आहे. आमदार टी. राजासिंह यांचे फेसबूक पेज बंद करणे म्हणजे एकप्रकारे हिंदु जनतेचा आवाज बंद करण्याचे काम ‘फेसबूक’ करत आहे. भारतात कोट्यवधी रुपये कमावणारे फेसबूक जर बहुसंख्य हिंदूंचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असेल, तर हिंदूही ‘फेसबूक’ला बहिष्कृत करतील, हे ‘फेसबूक’ने लक्षात घ्यावे.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *