Menu Close

आंदोलनाच्या नावाखाली असंतोष निर्माण होण्याच्या शक्यतेने यास अनुमती नाकारावी ! – हिंदु जनजागृती समिती

आज बेंगळुरू येथे गौरी लंकेश यांच्या हत्येच्या विरोधात ४०० समविचारी संघटनांचे आंदोलन

बेंगळुरू (कर्नाटक) : पत्रकार गौरी लंकेश हत्येविषयी उद्या ५ सप्टेंबर या दिवशी ‘आम्ही उठून उभे राहिलो नाही तर..’, ‘आम्ही विरोध केला नाही तर..’, या नावाने अनुमाने ४०० समविचारी संघटना एकत्र येऊन आंदोलन करणार आहेत. या आंदोलनाकडे वरवर पाहिले, तरी गौरी लंकेश यांच्या हत्येच्या नावाखाली असंतोष व्यक्त करण्यापेक्षा केंद्रशासनावर तीव्र टीका करण्याचा उद्देश अधिक असल्याचे स्पष्ट दिसते. नुकत्याच झालेल्या देहली आणि बेंगळुरू येथील दंगली पूर्वनियोजित होत्या. पोलिसांवर प्राणघातक आक्रमणे आणि सार्वजनिक संपत्तीची झालेली हानी पहाता समाजात अशांतता पसरवण्यासाठीच हा कट रचल्याचे स्पष्ट होते; म्हणून ५ सप्टेंबर २०२० या दिवशी आयोजित केलेले आंदोलन केंद्रशासनावर टीका करून शासनाला अस्थिर करण्याचा प्रयत्न आणि जनसामान्यांमध्ये फूट पाडून समाजात अशांतता पसरवण्याच्या उद्देशानेच करण्यात येत असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. त्यामुळे या आंदोलनाला अनुमती देऊ नये, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.

समितीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की,

१. गौरी लंकेश यादेखील नक्षलींच्या पाठीराख्याच होत्या आणि त्यांनी साकेत राजन या घातक नक्षल प्रमुखाविषयी लिखाणही केले होते. एवढेच नव्हे, तर त्यांच्या कार्यकर्त्यांनाही नक्षलवादी कारवायांच्या संदर्भात अटक करण्यात आली आहे.

२. गिरीश कर्नाड यांनीही वर्ष २०१८ मध्ये अशा आंदोलनात उघडपणे सहभागी होऊन ‘मी देखील शहरी नक्षली’ असे म्हणत नक्षलवादाचे समर्थन केले होते, याचा येथे प्रामुख्याने उल्लेख करावा, असे वाटते.

३. अशी अभियाने कायदा आणि सुव्यवस्थेला सरळ सरळ आव्हानच आहेत, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. त्यासाठी अशा कार्यक्रमांना अनुमती देऊ नये आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी; म्हणून राष्ट्राभिमानी, समाजहितैषी धर्मप्रेमी यांनी राज्यातील विविध जिल्ह्यांत तेथील जिल्हाधिकारी अन् पोलीस अधिकारी यांना निवेदन दिले आहे. या संदर्भात हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्तेही सहभागी झाले होते.

हिंदु जनजागृती समितीने केलेल्या मागण्या

अ. असे कार्यक्रम आणि आंदोलने करण्याची अनुमती देऊ नये. अशा कार्यक्रमांवर बंदी घालणे, हे कोरोना महामारीच्या दृष्टीनेही आवश्यक आहे.

आ. हे आपल्याला शक्य नसेल, तर अशा संघटनांना, संघटनांच्या आयोजकांना आवश्यक अशी नोटीस किंवा धोरण लागू करण्यात यावे.

इ. तरीही हे आंदोलन होणार असेल, तर त्याचे चित्रीकरण करून ठेवावे. त्यामुळे पुढे अपराध्यांच्या दृष्टीने आवश्यकता वाटल्यास त्याचा उपयोग करता येईल.

ई. या प्रकरणात अवैध कृत्ये होत असल्याचे दिसल्यास त्यात सहभागी असणार्‍या सर्वांवरच आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही करावी.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *