बँकॉक : चीनसाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेला थायलंडमधील ‘क्रा कॅनॉल प्रकल्प’ थायलंड सरकारकडून रहित करण्यात येणार आहे. चीनसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
१०२ कि.मी. लांबीच्या असलेल्या या प्रकल्पामुळेच चीनला हिंद महासागरापर्यंत पोचणे सहजशक्य होणार होते.
सध्या चीनला हिंद महासागरातील त्याने अतिक्रमण केलेल्या ठिकाणांपर्यंत पोचण्यासाठी अतिरिक्त १ सहस्र १०० कि.मी. प्रवास करावा लागत आहे. यापूर्वी थायलंडमधील नागरिकांनी केलेल्या तीव्र विरोधामुळे तेथील सरकारने चीनसमवेतच्या पाणबुड्यांचा करार रहित केला होता.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात