‘#TrueFaceOfGauriLankesh’ हा ‘हॅशटॅग’ राष्ट्रीय ‘ट्रेंड’मध्ये तृतीय स्थानी
मुंबई : पत्रकार गौरी लंकेश यांची ५ सप्टेंबर २०१७ या दिवशी बेंगळुरू येथे अज्ञातांकडून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर लगेचच साम्यवादी आणि प्रसारमाध्यमे यांनी संशयाची सुई हिंदुत्वनिष्ठांच्या दिशेने फिरवली. आतापर्यंत या हत्येच्या आरोपाखाली अनेक निरपराध हिंदूंना अटक करण्यात आली आहे; परंतु पोलिसांना कोणताही ठोस पुरावा मिळालेला नाही आणि गुन्हाही सिद्ध झालेला नाही. गौरी लंकेश यांच्या भावानेही म्हटले होते की, ‘या हत्येमागे नक्षलवाद्यांचा हात असू शकतो. गौरी लंकेश यांचे नक्षलवाद्यांशी संबंध होते’, असा आरोपही त्यांनी केला होता; मात्र अन्वेषण यंत्रणांनी या दिशेने कधीच अन्वेषण केले नाही. त्यामुळे अद्यापही खरे मारेकरी मोकाट आहेत. ५ सप्टेंबरला गौरी लंकेश यांच्या हत्येला ३ वर्ष पूर्ण झाली. त्यांचे खरे स्वरूप समोर आणणारा, तसेच खरे मारेकरी पकडण्याच्या मागणी करणारा ट्विटरवर ‘#TrueFaceOfGauriLankesh’ हा हॅशटॅग ट्रेंड झालेला दिसून आला. यावर धर्मप्रेमींनी ट्वीट्स केले. यामध्ये गौरी लंकेश यांचे कशाप्रकारे नक्षलवाद्यांशी संबंध होते, हे लोकांनी सांगून हत्येचे अन्वेषण त्या दिशेने करण्याची मागणी केली. हा ट्रेंड राष्ट्रीय ट्रेंडमध्ये तिसर्या क्रमांकावर होता. या ट्रेंडमध्ये २० सहस्रांहून अधिक ट्वीट् करण्यात आले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात