गेल्या वर्षी लक्ष्मी मंदिरालाही लावली होती आग
- आसाममध्ये भाजपचे राज्य असतांना तेथे धर्मांधांकडून अशा प्रकारची घटना घडणे हिंदूंना अपेक्षित नाही. हिंदूंच्या धार्मिक स्थळांचे रक्षण करण्यासाठी तेथील भाजप सरकारने अधिक लक्ष दिले पाहिजे, असे हिंदूंना वाटते !
- सातत्याने हिंदूंच्या मंदिरांना लक्ष्य करणार्या धर्मांधांवर कठोर कारवाई का करण्यात येत नाही ?
- धर्मांधांच्या श्रद्धास्थानांच्या संदर्भात असे काही झाले असते, तर तेथे दंगल भडकली असती आणि प्रसारमाध्यमांनी त्याचे वृत्त ‘धर्मनिरपेक्षरित्या’ दिले असते; मात्र येथे हिंदूंच्या धार्मिक स्थळांची तोडफोड होते आणि प्रसारमाध्यमे वृत्त दडपतात, हे लक्षात घ्या !
बारपेटा (आसाम) : येथील गनक कुची गावातील प्राचीन वैष्णव मठामध्ये तोडफोड करणे, श्रीमद्भगवद्गीता जाळणे, मठातील साहित्य बाहेर आणून जाळणे, गुरूंच्या आसनाची तोडफोड करून मठाला अपवित्र करणे, यांप्रकरणी पोलिसांनी रफीकुल अली याला अटक केली आहे. मठामध्ये आग लागून धूर येत असल्याचे पाहून स्थानिक लोक तेथे पोचले आणि त्यांनी अली याला पकडले अन् पोलिसांना बोलावून त्यांच्या कह्यात दिले. तो बारपेटा येथील शांतीपूरमध्ये रहाणारा आहे. अली मठामध्ये तोडफोड करत असतांना तेथे कुणीही उपस्थित नव्हते. या घटनेनंतर येथे तणाव निर्माण झाला. हा मठ १६ व्या शतकामध्ये श्री माधवदेव यांनी स्थापन केला होता. श्री माधवदेव श्रीमंत शंकरदेव यांचे शिष्य होते.
गेल्या वर्षी ८ ऑक्टोबरलाही रफीकुल अली याने बारपेटा येथील उत्कुची भागातील श्री लक्ष्मी मंदिरात घुसून तेथे आग लावली होती, तसेच मूर्तींवरील दागिने चोरले होते. तेव्हाही स्थानिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या कह्यात दिले होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात