Menu Close

टाटा, अंबानी आदी उद्योगपतींपेक्षा अधिक उत्पन्न असणारे सायरो मलबार चर्च कर भरत नाही !

देशातील हिंदूंची मोठमोठी मंदिरे कह्यात घेणारे सरकार या चर्चचे सरकारीकरण करण्याचे धाडस का दाखवत नाही ?

नवी देहली : टाटा, अंबानी, गोदरेज आदी उद्योगपतींपेक्षा अधिक उत्पन्न असणारे केरळमधील रोमन कॅथलिक सायरो मलबार चर्चकडून कोणत्याही प्रकारचा कर भरला जात नाही, अशी माहिती ‘क्रिटेली डॉट कॉम’ या संकतेस्थळाने प्रसिद्ध केलेल्या वृत्तात दिली आहे. या चर्चकडे ३ लाख कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे म्हटले जात आहे. भारतच नाही, तर जगातील सर्वच कॅथलिक चर्चमध्ये सायरो मलबार चर्चची संपत्ती सर्वाधिक आहे.

१. या चर्चकडे ११ सहस्रांहून अधिक संस्थांची मालकी आहे. या सर्व संस्था या चर्चच्या नावानेच चालवण्यात येतात. या चर्चकडे ९ सहस्र पाद्री, ३० सहस्र नन, ३ सहस्र ७६३ चर्च, ४ सहस्र ८६० शैक्षिणिक संस्था, २ सहस्र ६१४ रुग्णालये आणि चिकित्सालये आहेत. या चर्चचे ५० लाखांहून अधिक सदस्य आहेत.

२. सी.एम्.ए. नावाची संस्था ही चर्चची सर्वांत मोठी संस्था आहे. तिच्या अंतर्गत १ सहस्र ५१४ शाळा, महाविद्यालये आणि अनाथालये चालवण्यात येतात. या चर्चचे उत्पन्न देशातील अन्य कोणत्याही संस्थेपेक्षा अधिक आहे. या संस्थेचे देशातील प्रत्येक शहरामध्ये कार्यालय आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *