श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्या मिरवणुकीवर मात्र पोलिसांनी घातली होती बंदी
- पोलिसांचा कायदाद्रोह ! असे पोलीस कायदा आणि सुव्यवस्था काय राखणार ?
- अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन करणारे तेलंगाणा राष्ट्र समितीचे सरकार सत्तेत असणार्या तेलंगाणामधील पोलीस याहून वेगळे काय करणार ? भाग्यनगर पोलिसांच्या विरोधात न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याविषयी याचिका करून त्यांच्यावर कारवाई होण्यासाठी कायदाप्रेमी नागरिकांनी प्रयत्न केला पाहिजे !
भाग्यनगर (तेलंगाणा) : गेल्या आठवड्यात येथे न्यायालयाच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता लावून शेकडो लोक मोहरमच्या मिरवणुकीत सहभागी झाले होते. या वेळी अनेकांकडून मास्क लावण्यात आले नव्हते, तसेच सामाजिक अंतरही राखण्यात आले नव्हते. त्यांनी जुन्या भाग्यनगरमध्ये ‘बाबी का आलम’ मिरवणूक काढली. ही मिरवणूक मुसलमानबहुल चारमीनार, गुलजार हुज, पुरानी हवेली आणि दारूशिफा येथून मार्गस्थ होऊन चर्मघाट येथे समाप्त झाली. तेलंगाणा उच्च न्यायालयाने कोरोनाच्या संकटामुळे मोहरमच्या दिवशी जुन्या भाग्यनगरमध्ये मिरवणूक काढण्यास अनुमती दिली नव्हती. तसेच ‘या आदेशाचे उल्लंघन झाल्यास कठोर कारवाई करण्यात येईल’, असे बजावले होते. याविषयी पोलिसांना कारवाई करण्यास सांगितले होते. प्रत्यक्षात पोलीस आयुक्तांनी ही मिरवणूक काढण्यास अनुमती दिली. तसेच याला संरक्षणही दिले होते.
१. तेलंगाणामधील सत्ताधारी तेलंगाणा राष्ट्र समितीच्या सरकारने यावर्षी श्री गणेशचतुर्थीच्या वेळी, तसेच मोहरमच्या वेळी मिरवणूक काढण्यावर बंदी घातली होती.
२. सर्वोच्च न्यायालयानेही मोहरमची मिरवणूक काढण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली होती. न्यायालयाने म्हटले होते की, जर मिरवणूक काढण्याची अनुमती दिली, तर अराजकता निर्माण होईल आणि एका विशेष समाजाला कोरोनाचा संसर्ग पसरवण्यासाठी उत्तरदायी ठरवले जाईल, जे आम्हाला अपेक्षित नाही.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात