देशातील अनेक राज्यांत गोहत्या बंदी कायदा करण्यात आला असला, तरी अद्याप गोरक्षकांनाच गोहत्या रोखण्यासाठी रस्त्यावर उतरून गोरक्षण करावे लागत आहे, हे सरकारी यंत्रणांना लज्जास्पद आहे !
सिवनी (मध्यप्रदेश) : येथे ६ सप्टेंबर या दिवशी एका ‘पिकअप व्हॅन’मधून ३ गायींची कत्तलीसाठी वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती हिंदु सेवा परिषदेच्या कार्यकर्त्यांना मिळाली. त्या वेळी त्यांनी ही गाडी रोखून त्यातील तिन्ही गायींची सुटका केली. ३ पैकी २ गायी गर्भवती होत्या, अशी माहिती हिंदु सेवा परिषदेचे महानगर अध्यक्ष धीरज ज्ञानचंदानी यांनी दिली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात