सोलापूर येथे गणेशोत्सवानिमित्त ‘ऑनलाईन’ शौर्यजागृती व्याख्यानाचे आयोजन
सोलापूर : श्री गणेशाने विविध अवतार धारण करून असुरांचा नाश केला. इतिहासामध्ये क्रूर राजा नंदला धडा शिकवणारे चंद्रगुप्त मौर्य आणि आर्य चाणक्य यांचा आदर्श घेऊन आपणही शौर्याची उपासना करायला हवी. संत आणि द्रष्टे यांनी सांगितल्याप्रमाणे येत्या काळात तिसर्या महायुद्धाला कधीही आरंभ होऊ शकतो. त्यासाठी आपण साधना करून सिद्ध असायला हवे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात युवकांनी संघटितपणे प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे युवा संघटक श्री. निरंजन चोडणकर यांनी केले. गणेशोत्सवानिमित्त सोलापूर येथे नुकतेच ‘ऑनलाईन’ शौर्यजागृती व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या व्याख्यानामध्ये समितीच्या कार्यकर्त्यांनी ‘ऑनलाईन’ पद्धतीने स्वरक्षणासाठी कराटे आणि दंडसाखळी यांची प्रात्यक्षिके सादर केली.
धर्मप्रेमींचे अभिप्राय
श्री. लिंगराज हुळ्ळे, सोलापूर – या व्याख्यानातून शक्ती आणि भक्ती यांचे महत्त्व समजले. त्यानुसार आम्ही प्रयत्न करू.
कु. ऋतुजा साळुंके, कुर्डूवाडी, सोलापूर – साधनेसमवेत शारीरिक बळ वाढवण्याचे महत्त्व या व्याख्यानातून समजले.
कु. स्नेहल पारे, सोलापूर – व्याख्यान ऐकून हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यामध्ये योगदान देण्यास प्रेरणा मिळाली.