Menu Close

ख्रिस्ती मिशनर्‍यांनी तमिळनाडूतील प्राचीन श्री उच्छिष्ट विनयगर (विनायक) मंदिराजवळ बांधली अवैध दफनभूमी

जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कोणतीही कारवाई नाही

  • तमिळनाडूमध्ये हिंदुद्वेषी अण्णाद्रमुक पक्षाचे सरकार असल्याने तेथे धर्मांधांना पाठीशी घातले जात आहे, हे लक्षात घ्या ! अवैध दफनभूमी बांधेपर्यंत स्थानिक हिंदू झोपले होते का ?
  • अन्य धर्मियांच्या प्रार्थनास्थळांच्या शेजारी हिंदू कधीतरी अधिकृत स्मशानभूमी बनवू शकतात का ?

चेन्नई (तमिळनाडू) : काही मासांपूर्वी ख्रिस्ती मिशनर्‍यांनी प्राचीन श्री उच्छिष्ट विनयगर  (विनायक) मंदिर परिसरातील राजागोपूरम्च्या जवळच एक दफनभूमी  बनवली आहे. त्यांनी तेथे मृतदेह पुरण्यासही प्रारंभ केला आहे. ही जागा नंतर चर्चमध्येही पालटली जाऊ शकते, असे म्हटले जाते. मंदिर परिसरातील भूमीवर अवैधरित्या नियंत्रण मिळवण्यात आले आहे. मंदिर आणि ही दफनभूमी यांच्यात केवळ १० मीटरचे अंतर आहे. दफनभूमीसाठी शासनाकडून कोणतीही अनुमती घेतलेली नसतांना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून यावर कोणतीही कारवाई केली गेली नाही. गुंडांच्या साहाय्याने भूमीमालक भाविकांना धमकावत आहेत.

१. श्री उच्छिष्ट विनयगर मंदिर ८ एकर क्षेत्रात वसलेले संपूर्ण आशियामधील सर्वांत मोठे विनयगर मंदिर मानले जाते. या मंदिराचे नूतनीकरण वर्ष २०१६ मध्ये करण्यात आले होते. हे मंदिर तमिळनाडूच्या तिरुनेलवेली जंक्शनजवळ थमीरभाराणी नदीच्या काठी असून ते १ सहस्र २०० वर्षे जुने आहे. या ठिकाणी अनुमाने १५० हिंदु कुटुंबे वास्तव्यास आहेत.

२. धर्मादाय विभागाच्या अंतर्गत येणार्‍या या मंदिरात प्रतिदिन पूजाविधी केले जातात. ज्यांनी मंदिरासमोरील ४ सहस्र ३५६ वर्गफूट भूमी विकत घेतली आहे, ती शेती किंवा घर बांधण्यासाठीच वापरू शकतात. ती दफनभूमी करण्याच्या उद्देशाने वापरली जाऊ शकत नाही. याविषयी धर्मादाय विभागाकडे तक्रारी नोंदवल्यानंतरही त्यांनी कोणतीही कार्यवाही केलेली नाही.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *