-
‘ओम जय जगदीश हरे’ या भक्तीपर गीताच्या ‘रीमिक्स’वर नृत्य
-
जिल्हा प्रशासनाकडूनच चित्रीकरणास अनुमती
-
‘जागृती फाऊंडेशन’ने उठवला आवाज
- प्रशासनाने मशीद किंवा चर्च यांच्या परिसरात असे चित्रीकरण करण्याची अनुमती दिली असती का ? तसेच या चित्रपटाच्या निर्मात्यांनी अन्य पंथियांच्या प्रार्थनास्थळी असे कृत्य करण्याचे धाडस दाखवले असते का ? यावरून प्रशासन आणि निर्माते यांचा हिंदुद्वेष दिसून येतो ! उत्तरप्रदेशमधील योगी आदित्यनाथ सरकारने असे प्रशासकीय अधिकारी आणि संबंधित निर्माते यांच्यावर कठोर कारवाई करणे हिंदूंना अपेक्षित !
- चित्रपटाला ‘लव्ह यू शंकर’ हे नाव देऊन निर्मात्यांनी भगवान शिवाचा अवमानच केला आहे ! यास हिंदूंनी संघटितपणे आणि वैध मार्गाने विरोध करून धर्मकर्तव्य बजावले पाहिजे !
- हिंदूंनो, कुणीही तुमचा धर्म, धर्मग्रंथ, देवता, श्रद्धास्थाने, संत आणि राष्ट्रपुरुष यांचा अवमान करू धजावणार नाही, असे प्रभावी संघटन निर्माण करा !
वाराणसी : येथील सुप्रसिद्ध अस्सी घाटावर ‘लव्ह यू शंकर’ या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी त्यातील भक्तीपर गीताच्या ‘रीमिक्स’वर काही महिलांनी तोकड्या कपड्यांत नृत्य केल्याचा संतापजनक प्रकार घडला. यावर ‘जागृती फाऊंडेशन’ नावाच्या संस्थेने आक्षेप घेतल्यानंतर जिल्हा प्रशासनाने हे चित्रीकरण थांबवले.
अभिनेते श्रेयस तळपदे आणि अभिनेत्री तनीषा मुखर्जी हे या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहेत. तेजस देसाई हे या चित्रपटाचे निर्माते, तर राजीव रूईया त्याचे दिग्दर्शक आहेत. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला जिल्हा प्रशासनाने अनुमती दिल्यानंतर अस्सी घाटावर मंच उभारण्यात आला होता. त्यामागे लावलेल्या पडद्यावर देवतांची चित्रे होती. त्या समोरच काही महिला तोकड्या कपड्यांत ‘ओम जय जगदीश हरे’ या भक्तीपर गीताच्या ‘रीमिक्स’वर नृत्य करत होत्या. यावर ‘जागृती फाऊंडेशन’ने आक्षेप घेत जिल्हाधिकारी कौशल राज शर्मा यांच्याकडे या चित्रपटाचे चित्रीकरण तात्काळ थांबवण्याची मागणी केली. या विरोधात पोलिसांत तक्रार प्रविष्ट करणार असल्याचीही माहिती ‘जागृती फाऊंडेशन’चे महासचिव रामयश मिश्र यांनी दिली. (धर्महानी रोखण्यासाठी तत्परतेने कृती करणार्या ‘जागृती फाऊंडेशन’चे महासचिव रामयश मिश्र यांचे अभिनंदन ! सर्वत्रच्या हिंदूंनी यातून बोध घ्यावा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
चौकशी करून कारवाई केली जाईल ! – ए.डी.एम्. गुलाब चंद्र यांचे ठोकळेबाज उत्तर
याविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना ए.डी.एम्. गुलाब चंद्र म्हणाले की, ‘या चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रीकरण करण्याची अनुमती घेतली होती. तथापि त्यात धार्मिक भावना दुखावल्या असतील, तर त्याची चौकशी करून कारवाई केली जाईल.’ (आपण कशाला अनुमती देत आहोत, याचेही भान प्रशासनाला नसते का ? अनुमती दिल्यानंतर तेथे प्रत्यक्षात काय चालू आहे ?, हे बघणे प्रशासनाचे दायित्व नाही का ? त्यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या जाण्यास प्रशासनही तितकेच उत्तरदायी आहे. त्यामुळे योगी आदित्यनाथ सरकारने संबंधित अधिकार्यांना तात्काळ निलंबित केले पाहिजे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
हा धार्मिक भावनांशी खेळण्याचा प्रकार ! – रामयश मिश्र, ‘जागृती फाऊंडेशन’
‘जागृती फाऊंडेशन’चे महासचिव रामयश मिश्र म्हणाले, ‘‘काशीमध्ये भारतीय संस्कृती शिकण्यासाठी देश-विदेशांतून लोक येतात. सहस्रो पर्यटक येथे येऊन भारतीय संस्कृती आत्मसात करतात. याशिवाय ज्या अस्सी घाटावर गोस्वामी तुलसीदास यांनी ‘रामचरित मानस’ची रचना करून अखिल मानवजातीला जीवन जगण्याचे सार उलगडून सांगितले, त्या घाटावर उघडउघड नग्नता आणि अश्लीलता पसरवली जात आहे. काशी नगरीत वेद, पुराण, उपनिषद यांसह धर्माचे शिक्षण आणि दीक्षा दिली जाते. अशा नगरीत धार्मिक गाण्यांवर अश्लीलता पसरवणे, हा धार्मिक भावनांशी खेळण्याचा प्रकार आहे. जिल्हा प्रशासनाने या चित्रपटाचे चित्रीकरण त्वरित रोखावे, तसेच चित्रपटाच्या निर्मात्यांवर गुन्हा नोंदवावा.’’
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात