केरळमध्ये ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्याच्या हत्येचा परिणाम
- केरळमध्ये साम्यवादी माकपचे सरकार आहे. त्यामुळे तेथील हिंदुत्वनिष्ठांचे रक्षण होईल, याची शक्यता वाटत नसल्याने केंद्र सरकारने त्यांना संरक्षण पुरवावे, असे हिंदूंना वाटते !
- जिहादी आतंकवाद्यांना धर्म असतो, त्यामुळे ते हिंदूंना आणि अन्य धर्मियांना लक्ष्य करतात; मात्र पुरो(अधो)गामी, निधर्मीवादी यावर मौन बाळगतात !
कोची (केरळ) : सय्यद महंमद सलाहुद्दीन या ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या (‘पी.एफ्.आय.’च्या) कार्यकर्त्याची ८ सप्टेंबर या दिवशी केरळमधील कन्नूर जिल्हातील कोथूपारंबूजवळील कन्नवम येथे हत्या करण्यात आली. त्यानंतर केरळ राज्याचे भाजपचे अध्यक्ष के. सुरेंद्रन् आणि ‘हिंदु हेल्पलाईन’चे अधिवक्ता प्रदीश विश्वनाथ हे एस्.डी.पी.आय. (सोशलिस्ट डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया), पी.एफ्.आय. आणि इंडियन युनियन ऑफ मुस्लिम लीग (आय.यू.एम्.एल्.) यांचे लक्ष्य बनले आहेत.
१. १९ जानेवारी २०१८ या दिवशी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदचे कार्यकर्ते श्याम प्रसाद यांच्या हत्येच्या प्रकरणी सलाहुद्दीन हा ७ वा आरोपी होता. श्याम प्रसाद ‘आय.टी.आय., कक्कयनगड’चे विद्यार्थी आणि कन्नवममधील रा.स्व. संघाचे सक्रीय सदस्य होते. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाशी संबंधित जिहाद्यांनी त्यांच्यावर प्राणघातक शस्त्रांनी आक्रमण करून त्यांची हत्या केली. या हत्येत १३ जण आरोपी आहेत. त्यांना हत्या करून पळण्यासाठी पी.एफ्.आय.ने साहाय्य केल्याचा आरोप आहे.
२. सलाहुद्दीनही पसार होता. नंतर मार्च २०१९ मध्ये कन्नूरच्या मट्टानूर येथील दंडाधिकारी न्यायालयासमोर तो शरण आला. त्यानंतर तो जामिनावर सुटला होता आणि नंतर त्याची हत्या झाली.
तुर्कस्तानमधील मल्याळी जिहादी आतंकवादी महिलेकडून हिंदू नेत्यांची हत्या करण्याची मागणी
तुर्कस्तानात रहाणार्या एका जिहादी आतंकवादी असणार्या मल्याळी महिलेने सलाहुद्दीनच्या हत्येच्या बदल्यात हिंदूंच्या रक्ताची मागणी केली आणि तिच्या स्थानिक मित्रांना भाजपचे अध्यक्ष के. सुरेंद्रन् आणि अधिवक्ता प्रदीश विश्वनाथ यांच्यासह संघाच्या प्रमुख नेत्यांना ठार मारण्याची मागणी केली.
अधिवक्ता प्रदीश विश्वनाथ यांचा परिचय
अधिवक्ता प्रदीश विश्वनाथ हे ‘हिंदू सेवा केंद्र’ नावाची संस्था चालवतात. त्यांनी मंदिराच्या भूमीवरील अनेक अतिक्रमणे उघडकीस आणली असून न्यायालयांमध्ये त्याविषयी सक्रीयपणे पाठपुरावा केला आहे. अशा अनेक भूमी मंदिराच्या नावावर आहेत; मात्र त्यावर राज्य सरकार, मुसलमान किंवा ख्रिस्ती यांच्या कह्यात आहेत. शबरीमला प्रकरणी आंदोलनाचे नेतृत्व केले आहे. प्रथिश यांच्या संस्थेने लव्ह जिहाद प्रकरणी केरळमधील ९ सहस्रांहून अधिक पीडितांना वाचवले आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात