चीन सरकारच्या भीतीने चीनहून अमेरिकेला स्थलांतरित झालेल्या महिला विषाणूशास्त्रज्ञाचे वक्तव्य
वॉशिंग्टन : कोरोना विषाणू हा चीननेच वुहानमधील प्रयोगशाळेत निर्माण केला असून त्यापासून महामारी पसरल्याचे सत्यही लपवण्याचा प्रयत्न केला आहे. या जीवघेण्या विषाणूची निर्मिती चीननेच केली असल्याचे पुरावे मी सादर करणार आहे, अशी माहिती चीनमधील महिला विषाणूशास्त्रज्ञ डॉ. ली मेंग यान यांनी दिली. डॉ. यान या चीन सरकारच्या भीतीने चीनमधून अमेरिकेला स्थलांतरित झाल्या आहेत. ‘विषाणूच्या ‘जीनोम सिक्वेन्स’द्वारे ‘कोरोना विषाणूची निर्मिती नैसर्गिक आहे कि मानव-निर्मित ?’, हे कळू शकते. मी जे पुरावे सादर करणार आहे त्यातून विज्ञानाचा गंध नसलेल्यांनाही ‘हा विषाणू मानव-निर्मितच आहे’, हे सहज समजू शकेल, असे त्यांनी म्हटले आहे.
धमक्या मिळू लागल्यानेच चीन सोडले ! – डॉ. ली मेंग यान
डॉ. ली मेंग यान या हाँगकाँग विद्यापिठात संशोधक म्हणून काम करत होत्या. तेव्हा त्यांनी कोरोना विषाणूवर अभ्यास आणि संशोधन करणे चालू केले. कोरोना विषाणूवर अभ्यास संशोधन करणार्या त्या चीनमधील मोजक्या विषाणूशास्त्रज्ञांपैकी एक होत्या. त्याच वेळी त्यांना चिनी अधिकार्यांकडून धमक्या मिळू लागल्या. तेव्हा स्वतःच्या जिवाला धोका असल्याचे लक्षात येताच त्यांनी अमेरिकेत स्थलांतर केले. आता अमेरिकेत त्यांना अज्ञातस्थळी ठेवण्यात आले आहे. ‘चीन सरकारने माझ्याशी संबंधित सर्व माहिती सरकारी दस्ताऐवजातून पुसून टाकली आहे’, अशीही माहिती डॉ. यान यांनी दिली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात