अयोध्येत प्रभु श्रीरामांचे भव्य मंदिर उभारण्याचे काम चालू झाले आहे; मात्र देशात अद्यापही विविध माध्यमांतून भगवान श्रीरामांसह अन्य देवतांचा अवमान होतच आहे. तो रोखण्यासाठी सरकारने कठोर कायदा केला पाहिजे !
(वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक)
मुंबई : कापराचे उत्पादन आणि विक्री करणार्या रायगड जिल्ह्यातील कुंभीवली येथील ‘मंगलम् ऑरगॅनिक्स लिमिटेड’ या आस्थापनाने त्याच्या ‘मंगलम् कर्पूर’ या उत्पादनाच्या विज्ञापनामध्ये प्रभु श्रीराम यांना सेल्फी (भ्रमणभाष संचातील कॅमेर्याद्वारे स्वतःच स्वतःचे छायाचित्र काढणे) काढतांना दाखवून प्रभु श्रीरामाचा केलेला घोर अवमान अद्यापही चालूच आहे. याला गेल्या काही मासांपासून हिंदु धर्माभिमान्यांकडून वैध मार्गाने विरोध केला जात असतांनाही या आस्थापनाकडून हे विज्ञापन हटवण्यात आलेले नाही. त्यामुळे पुन्हा त्यास विरोध केला जात आहे.
या विज्ञापनात ‘प्रभु श्रीरामाच्या वेशातील एक व्यक्ती सेल्फी काढत असतांना तिच्या आईचा तिला दूरभाष येतो आणि ती तिला कापूर आणण्याची आठवण करून देते. त्यानंतर ही व्यक्ती कापूर खरेदी करण्यासाठी दुकानात जातेे. या व्यक्तीची वेशभूषा पाहून दुकानदार तिला तिजोरीमध्ये ठेवलेला ‘मंगलम् कापूर’ देतो. त्यानंतर ते दोघेही कापरासह सेल्फी काढतात’, असे दाखवण्यात आले आहे.
या विज्ञापनामुळे धार्मिक भावना दुखावलेले धर्माभिमानी हिंदू पुढील संपर्कावर निषेध नोंदवत आहेत.
संपर्क क्रमांक : (०२२) ४९२०४०८९
[email protected]
राष्ट्र्रद्रोही आणि हिंदुद्रोही घटनांचा संयत मार्गाने निषेध करा !
हिंदुद्रोह्यांचा निषेध करण्यामागचा मुख्य उद्देश त्यांचे वैचारिक परिवर्तन करणे, हा आहे. त्यामुळे कुणाचाही निषेध करतांना तात्त्विक सूत्रांच्या आधारे वैचारिक स्तरावर करा ! चुकणार्या व्यक्तीला तिच्या चुका सांगून योग्य मार्गावर आणणे, हा व्यापक दृष्टीकोन निषेध व्यक्त करण्यामागे हवा !
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात