देवतांचा जाणूनबुजून अवमान करणार्या आस्थापनांच्या उत्पादनांवर हिंदूंनी बहिष्कार घातल्यास आश्चर्य वाटणार नाही !
मुंबई : ‘सुपर शक्ती मेटालिक्स’ या आस्थापनाने श्री इंद्रदेव, श्री विश्वकर्मा देव आणि श्री नारदमुनि यांचे विडंबन करणारे विज्ञापन संकेतस्थळावर प्रदर्शित केले आहे.
‘सुपर शक्ती मेटालिक्स’ हे गृहनिर्मितीसाठी लागणार्या ‘टी.एम्.टी. बार्स’चे उत्पादन आणि विक्री करणारे आस्थापन आहे. या आस्थापनाने त्याचे उत्पादन विकण्यासाठी व्यावसायिक हेतूने व्हिडिओद्वारे विज्ञापन बनवून त्यात श्री इंद्रदेव, श्री विश्वकर्मा देव आणि श्री नारदमुनि यांचे विडंबन केले आहे. याविषयीची माहिती धर्मप्रेमींनी हिंदु जनजागृती समितीला दिली. यावर समितीने फेसबूक, टि्वटर आदी सामाजिक माध्यमांतून यास वैध मार्गाने विरोध केला आणि हिंदूंनाही वैध मार्गाने विरोध करण्याचे आवाहन केले. यावर या विज्ञापनात श्री इंद्रदेवाची भूमिका साकारणार्या द्विवेदी नावाच्या व्यक्तीने हा व्हिडिओ स्वतःच्या यू-ट्यूबवरून हटवला होता; परंतु तो आस्थापनाच्या अधिकृत संकेतस्थळावर ठेवण्यात आला आहे.
विज्ञापनातील विडंबन
या विज्ञापनात देवराज इंद्र याच्या स्वर्गलोकातील दरबारात एक नृत्याचा कार्यक्रम असतो. तेथे अप्सरा सर्वांसमोर त्यांचे नृत्य सादर करतात. नृत्य चालू असतांना महालातील छताचे ‘प्लास्टर’ खाली पडते. तरीही अप्सरा त्यांचे नृत्य चालूच ठेवतात. काही वेळाने मोठ्या प्रमाणात प्लास्टर पडते, तेव्हा नृत्याचा कार्यक्रम थांबवला जातो. हे पाहून श्री इंद्रदेव ‘हे काय चालू आहे ?’, अशी विचारणा करतात. यावर श्री विश्वकर्मा देव त्यांना सांगतात की, ‘हलक्या गुणवत्तेच्या टी.एम्.टी. बार्स’चा वापर केल्याचा हा परिणाम आहे. यावर श्री इंद्रद्रेव त्यांना ‘यावर उपाय काय ?’ अशी विचारणा करतात. तेव्हा तेथे श्री नारदमुनि प्रकट होऊन म्हणतात ‘यावर उपाय म्हणजे भूलोकावरील ‘सुपर शक्ती टी.एम्.टी. बार्स’ हा असून ते बळकट पकड देते.’ त्यानंतर पुन्हा नृत्याचा कार्यक्रम चालू होतो. शेवटी श्री नारदमुनि म्हणतात ‘नाचा नाचा. आता देवलोकसुद्धा बनला आहे ‘सुपर शक्ती’पासून ‘सुपर स्ट्राँग.’
या विज्ञापनातून हिंदूंच्या देवतांचा अवमान झाल्याने कोट्यवधी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत.
लिंक : https://supershakti.in/
हिंदुद्रोही घटनांचा संयत मार्गाने निषेध करा !
हिंदुद्रोह्यांचा निषेध करण्यामागचा मुख्य उद्देश त्यांचे वैचारिक परिवर्तन करणे, हा आहे. त्यामुळे कुणाचाही निषेध करतांना तात्त्विक सूत्रांच्या आधारे वैचारिक स्तरावर करा ! चुकणार्या व्यक्तीला तिच्या चुका सांगून योग्य मार्गावर आणणे, हा व्यापक दृष्टीकोन निषेध व्यक्त करण्यामागे हवा !
धर्मप्रेमी हिंदू पुढील संपर्कावर वैध मार्गाने निषेध नोंदवत आहेत
फेसबूक : https://www.facebook.com/supershaktitmtsaria/
टि्वटर : https://twitter.com/supershakti_tmt
ई-मेल : [email protected]
दूरभाष क्रमांक : (०३४३) २५५२५९८; (०३४३) ६५३०२६४; (०३४३) २५५३२८४
(ही छायाचित्रे छापण्यामागे लोकांच्या धार्मिक भावना दुखावण्याचा उद्देश नसून वस्तूस्थिती कळावी, या उद्देशाने प्रसिद्ध केली आहेत. – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात,