Menu Close

गाजीपूर (बांगलादेश) येथील श्री महाकाली मंदिरातील मूर्तीची तोडफोड

मुसलमानबहुल देशात हिंदू आणि त्यांची मंदिरे असुरक्षित असतात, हे सत्य देशातील पुरो(अधो) आणि निधर्मीवादी कधीच सांगत नाहीत, हे लक्षात घ्या !

वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक

गाजीपूर (बांगलादेश) : बांगलादेशातील ‘ढाका ट्रिब्युन’ दैनिकाने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार ११ सप्टेंबरच्या रात्री अज्ञातांनी ढाका येथील गाजीपूरमधील दक्खिन सलाना भागातील श्री महाकाली मातेच्या मंदिरातील मूर्तींची रात्री तोडफोड करण्यात आली. पोलीस तोडफोड करणार्‍यांचा शोध घेत आहेत.

मंदिर व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नरेश राय यांनी सांगितले की, काही प्रभावशाली स्थानिक लोक मंदिराची भूमी हडपण्याच्या प्रयत्नात आहेत. १० सप्टेंबरला त्यांनी मंदिर रिकामी करण्याचा प्रयत्न केला होता; मात्र काही स्थानिकांनी केलेल्या विरोधामुळे ते शक्य झाले नाही. त्यामुळेच दुसर्‍या दिवशी रात्री तोडफोड करण्यात आली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *