-
धर्मांतरासाठी हिंदु युवतीला खाऊ घातले गोमांस
-
धर्मांतरास नकार देणार्या युवतीवर जीवघेणे आक्रमण
-
मौलवीशी शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव
- लव्ह जिहादची अनेक प्रकरणे उघड होऊनही सरकार त्याविरोधात कायदा का करत नाही ?
- उत्तरप्रदेशमधील लव्ह जिहादच्या वाढत्या घटना पहाता तेथील हिंदू असुरक्षित आहेत, हे स्पष्ट होते. योगी आदित्यनाथ यांच्या राजवटीत असे होणे हिंदूंना अपेक्षित नाही. असे प्रकार रोखण्यासाठी सरकारने धडक पावले उचलणे हिंदूंना अपेक्षित आहे !
कानपूर (उत्तरप्रदेश) : हिंदु नाव धारण करून हिंदु युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढणार्या धर्मांधास लोकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. शिबू नावाच्या धर्मांधाने स्वतःचे हिंदु नाव सांगून किदवई नगर येथील एका हिंदु युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि तिला पळवून नेले. धर्मांधाने तिच्यावर धर्मांतर करण्यासाठी दबाव आणला. यासाठी त्याने हिंदु युवतीला गोमांस खाऊ घातले. तरीही युवती धर्मांतर करण्यास सिद्ध न झाल्याने त्याने तिला मौलवीच्या स्वाधीन करून तिच्यावर मौलवीशी शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव आणला. यासह या धर्मांधाने युवतीचे अश्लील व्हिडिओ बनवून ते प्रसारित करण्याची धमकी दिली. तरीही युवतीने धर्मांतरास नकार दिल्यावर त्याने तिच्यावर चाकूने जीवघेणे आक्रमण केले. त्या वेळी लोकांनी त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. यानंतरही पीडित युवतीच्या कुटुंबियांना ठार मारण्याच्या धमक्या मिळत आहेत.
उत्तरप्रदेशमध्ये लव्ह जिहादच्या २१ दिवसांत ११ घटना उघड
ही स्थिती सरकारी यंत्रणांना लज्जास्पद ! हिंदूंवरील आघात रोखण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !
उत्तरप्रदेशमध्ये प्रतिदिन लव्ह जिहादच्या घटना उघड होत असून गेल्या २१ दिवसांत लव्ह जिहादच्या ११ घटना उघड झाल्या आहेत. राज्यात लव्ह जिहादच्या प्रकरणांचे अन्वेषण करण्यासाठी विशेष अन्वेषण पथक स्थापन करण्यात आले आहे. (गुन्हा घडून गेल्यानंतर नव्हे, तर गुन्हा घडूच नये, यासाठीच्या उपाययोजना काढणे योगी आदित्यनाथ सरकारकडून अपेक्षित ! – संपादक,दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात