Menu Close

गौतम बुद्ध नगर (उत्तरप्रदेश) येथे मंदिरात ध्वनीक्षेपक लावल्याच्या कारणावरून धर्मांधांकडून हिंदु व्यक्तीला मारहाण

धर्मांधांनी ध्वनीक्षेपक बलपूर्वक बंद केला !

  • असे व्हायला हा पाकिस्तान आहे का? योगी आदित्यनाथ यांच्या उत्तरप्रदेशमध्ये असे घडणे हिंदूंना अपेक्षित नाही. सरकारने यातील दोषींवर कठोर करवाई करणे अपेक्षित !
  • ‘चोर तो चोर वर शिरजोर’ वृत्तीचे धर्मांध ! मशिदींवरील अनधिकृत भोंगे चालतात; पण हिंदूंनी त्यांच्या मंदिरांवर ध्वनीक्षेपक लावायचे नाहीत, ही तालिबानी वृत्ती आहे. सरकारने हे वेळीच रोखले नाही, तर उद्या हिंदूंना या देशातून हाकलून लावायला अशा धर्मांध प्रवृत्ती पुढे-मागे पहाणार नाहीत, हे सत्य जाणा आणि असे होऊ द्यायचे नसेल, तर संघटित होऊन हिंदु राष्ट्राची स्थापना करा !
  • मशिदींवर लावण्यात आलेले अनधिकृत ध्वनीक्षेपक काढण्याच्या मागणीसाठी हिंदू पोलीस-प्रशासनाला वारंवार निवेदने देतात; पण तरीही त्यांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत. याउलट धर्मांध मात्र त्यांना नको असलेली गोष्ट रोखण्यासाठी थेट कायदा हातात घेतात आणि त्यांना हवे ते पदारात पाडून घेतात. तरीही पुरो(अधो)गामी हे हिंदूंनाच असहिष्णु ठरवतात !

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) : मंदिरात ध्वनीक्षेपक लावल्याच्या कारणावरून धर्मांधांनी स्वराज सिंह नावाच्या हिंदु व्यक्तीला मारहाण केली. उत्तरप्रदेशमधील गौतम बुद्ध नगर जिल्ह्यातील अच्छेजा या गावात नुकताच हा प्रकार घडला. या प्रकरणी स्वराज सिंह यांनी केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अफझल, शराफ आणि गुलजार यांना अटक केली.

स्वराज सिंह यांनी तक्रारीत म्हटले आहे की, ‘प्रतिदिन ध्वनीक्षेपकावर भजन आणि आरती लावली जाते. ४ सप्टेंबर २०२० या दिवशी सकाळी गावातील काही धर्मांधांनी ध्वनीक्षेपक बंद करण्याची धमकी दिली. त्यास मी विरोध केला; परंतु धर्मांधांनी ध्वनीक्षेपक बलपूर्वक बंद केला. दुपारच्या वेळी मी माझ्या मुलीसह शेतात चारा आणायला गेलो असता तेथे हातात काठ्या घेतलेले काही धर्मांध आले आणि त्यांच्यापैकी अफझल, शराफ आणि गुलजार यांनी पुन्हा मला ध्वनीक्षेपक न वाजवण्याची आणि तसे केल्यास जिवे मारण्याची धमकी दिली.’’

या प्रकरणी ३ आरोपींना अटक करण्यात आली असून घटनेची चौकशी चालू आहे. सुरक्षेच्या कारणास्तव घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे, अशी माहिती अपर पोलीस उपायुक्त विशाल पांडे यांनी दिली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *