विनाअनुमती उत्खनन चालू असल्याने कारवाई
अयोध्या (उत्तरप्रदेश) : अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीवर चालू असलेले श्रीराममंदिराचे काम थांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या मंदिरासाठी लागणार्या गुलाबी दगडाच्या बंसी पहाडपूरमधील खाणीवर राजस्थानमधील काँग्रेस सरकारने बंदी घातली आहे. ‘कोणत्याही अनुमतीविना येथे उत्खनन चालू होते, त्यामुळे कारवाई करण्यात आली’, अशी माहिती जिल्हाधिकारी नथमल दिदेल यांनी दिली. येथूनच श्रीराम मंदिरासाठी दगड मागवण्यात येत होते. या सूत्रावर श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी, ‘या प्रकरणी वेळ आल्यावर योग्य ती माहिती दिली जाईल’, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. दिली.
१. श्रीराममंदिरासाठी जवळपास ३ लाख घनफूट दगडांची आवश्यकता आहे. आतापर्यंत १ लाख घनफूट दगडांची व्यवस्था करण्यात आली आहे. उरलेले दगड बंसी पहाडपूर येथील खाणीतून अयोध्येसाठी मागवण्यात आले होते.
२. गुलाबी दगड (पिंक स्टोन) हा मार्बलपेक्षाही स्वच्छ आणि दिसायला सुंदर आहे. या दगडाचे आयुष्य जवळपास १ सहस्र वर्षे इतके आहे. राजस्थानातील हे दगड पक्के आणि उत्तम दर्जाचे आहेत. त्यामुळे ते श्रीराममंदिरासाठी वापरण्यात येणार आहेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात