Menu Close

हिंदूंच्या विरोधानंतर ‘श्रीराम चिकन मसाला’ नावाने उत्पादन विकणार्‍या आस्थापनाच्या मालकाची क्षमायाचना

नाव पालटण्याचे आणि बाजारातील उत्पादन मागे घेण्याचे मान्य  

देवतांचा होणारा अवमान रोखण्यासाठी वैध मार्गाने कृतीशील होणार्‍या हिंदूंचे अभिनंदन ! सर्वत्रच्या हिंदूंनी यातून आदर्श घ्यावा !हिंदु वैध मार्गाने विरोध करतात, तर धर्मांध कायदा हातात घेऊन हिंसाचार करतात ! तरीही निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी हिंदूंना ‘तालिबानी’ म्हणतात आणि धर्मांधांविषयी मौन बाळगतात !

बिकानेर (राजस्थान) : येथील ‘बिकानेर ब्राह्मण समाजा’ने ‘श्रीराम’ नावाने चिकन मसाला बनवणार्‍या ‘श्रीराम इंडस्ट्री’च्या मालकाचा घेराव घातला आणि त्याला उत्पादनाचे नाव मागे घेण्यास भाग पाडले. घेराव घातल्यानंतर या मालकाने स्वतःची चूक मान्य करून या नावाची पाकिटे जाळून टाकली. बाजारात असलेली या नावाची उत्पादने परत मागवण्याचेही मान्य केले. तसेच सर्व हिंदूंची क्षमायाचना केली. ‘अजाणतेपणे झालेल्या या चुकीसाठी प्रायश्‍चित्त घेऊ’, असेही त्याने सांगितले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *