भोपाळ येथील ‘लक्ष्मीनारायण कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजी’ येथे ‘तणावमुक्ती आणि संतुलित जीवनाचे रहस्य’ या विषयावर ‘ऑनलाईन’ मार्गदर्शन
भोपाळ (मध्यप्रदेश) : बाह्य संगणकांची सेवा करतांना आपल्या अंतरंगातील संगणकालाही साधनेने जागृत केले पाहिजे. कोरोनासारख्या विषम परिस्थितीत न घाबरता संकल्पाने काम करण्याची आवश्यकता आहे. सध्या कोरोना संक्रमणाचा काळ आहे. अनेक युवक तणावाच्या स्थितीत जीवन जगत आहेत. यावर मात करण्यासाठी सकारात्मक राहून मनाची शक्ती वाढवली पाहिजे. त्यामुळे आपल्यासमोर कितीही मोठे लक्ष्य असले, तरी आपण ध्येय प्राप्त करू शकतो. युवकांनी अध्यात्म जीवनात अंगीकारल्यास तणावमुक्त जीवन जगता येईल, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी केले. येथील ‘लक्ष्मीनारायण कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजी’ (एल्.एन्.सी.टी.) येथे महाविद्यालयामध्ये ‘तणावमुक्ती आणि संतुलित जीवनाचे रहस्य’ या विषयावर संगणकशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी नुकतेच एका ‘ऑनलाईन’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये ते मार्गदर्शन करत होते.
या कार्यक्रमाला एल्.एन्.सी.टी. समूहाचे सचिव डॉ. अनुपम चौकसे यांची प्रमुख उपस्थिती होती. महाविद्यालयाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अशोक राय यांनी या कार्यशाळेच्या आयोजनासाठी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अमितबोध उपाध्याय यांनी केले. या कार्यक्रमाचा लाभ अनेक विद्यार्थ्यांनी घेतला.
अभिप्राय
कु. अपर्णा भरती, छिंदवाडा, मध्यप्रदेश : कार्यशाळेतून पुष्कळ शिकायला मिळाले. कोरोनामुळे मनावर पुष्कळ तणाव होता; परंतु आता चांगले वाटत आहे.
कु. अग्निशकुमार पाटलीपुत्र, बिहार : प्रवचन अतिशय चांगले वाटले. जीवन समजून घेण्यासाठी माहिती मिळाली.
क्षणचित्रे
- कार्यक्रमानंतर काही युवकांनी तणावमुक्तीसाठी ‘ऑनलाईन’ वर्ग चालू करण्याची मागणी केली, तसेच काही विद्यार्थ्यांनी तणावमुक्तीसाठी नियमित ‘व्हॉॅट्सअॅप’ संदेश पाठवण्याची मागणी केली.
- काही विद्यार्थ्यांनी अशा प्रकारच्या विविध ‘ऑनलाईन’ कार्यक्रमांना जोडण्यासाठी नोंदणी केेली.
- काही विद्यार्थ्यांनी ‘तणावमुक्ती’संबंधी सनातन संस्थेकडे उपलब्ध असलेल्या ग्रंथांची माहिती मागितली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात