Menu Close

देहली दंगलीतील आरोपींना कायदेशीर साहाय्य करण्यासाठी युरोपमधील ४ चर्चकडून ख्रिस्त्याच्या संस्थेला देण्यात आले ५० कोटी रुपये !

‘लिगल राईट्स ऑब्झर्व्हेटरी’ संस्थेचा दावा

देहलीतील दंगल धर्मांधांनी केली, त्यासाठी मध्य-पूर्वेतील देशांतून पैसे देण्यात आले आणि त्यांना वाचवण्याचा प्रयत्न चर्च करत आहेत, याचा अर्थ हे भारतातील हिंदूंच्या विरोधातील आंतरराष्ट्रीय षड्यंत्रच आहे, हे लक्षात घेऊन देशात हिंदु राष्ट्राची स्थापना करण्याला पर्याय नाही, हे लक्षात घ्या !

हिंदुविरोधी कृत्यासाठी विदेशातून एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसा येत असतांना गुप्तचर संस्था काय करत होत्या ?

नवी देहली : देहली दंगलीच्या प्रकरणी अटक केलेल्या धर्मांधांना वाचवण्यासाठी कायदेशीर साहाय्य मिळावे म्हणून युरोपमधील ४ चर्चकडून कॉलिन गोन्साल्विस या व्यक्तीची संस्था ‘ह्यूमन राइट्स लॉ नेटवर्क’ला (‘एच्.आर्.एल्.एन्.’ला) ५० कोटी रुपये देण्यात आल्याची माहिती ‘लिगल राईट्स ऑब्झर्व्हेटरी’, म्हणजेच ‘एल्.आर्.ओ’ या संस्थेने ट्वीट्स करून दिली आहे.

१. एच्.आर्.एल्.एन्.च्या संकेतस्थळावर लिहिण्यात आले आहे की, त्यांच्याच अधिवक्त्यांनी ‘सीएए’च्या विरोधातील दंगलीच्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्यांचा बचाव करण्याचा प्रयत्न केला आहे. यातील मुख्य आरोपी असणार्‍या सफुरा जरगर हिचाही बचाव केला आहे.

२. ‘एल्.आर्.ओ.’ने म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींना एच्.आर्.एल्.एन्.चे संचालक म्हणून नियुक्त केले होते. कारण त्यातून उच्च न्यायालयातील खटल्यांवर त्यांचा प्रभाव पडून त्यांच्या बाजूने निकाल लागेल.

३. ‘एल्.आर्.ओ’ संस्थेने केंद्रीय गृहमंत्रालयाकडे मागणी केली आहे की, ‘यु.ए.पी.ए.’ कायद्याच्या अंतर्गत कॉलिन गोन्साल्विस आणि एच्.आर्.एल्.एन्. संस्थेचे सदस्य अन् संचालक यांना अटक करून त्यांच्यावर खटला चालवण्यात यावा.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *