हिंदु जनजागृती समितीकडून विरोध
‘झी’ आस्थापन स्वतःला हिंदुत्वनिष्ठ दाखवण्याचा प्रयत्न करत असते; मात्र तिच्याच वाहिनीवरून हिंदूंच्या देवतांचा अवमान होतो, हे हिंदूंना अपेक्षित नाही !
वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक
नवी देहली : ‘झी टीव्ही’ या खासगी वाहिनीवर ५ ऑक्टोबरपासून ‘राम प्यारे सिर्फ हमारे’ नावाची हिंदी मालिका प्रसारित होणार आहे. या मालिकेचा ‘प्रोमो’ (प्रसिद्धीसाठी मालिकेतील दाखवण्यात येणारा भाग) दाखवण्यात येत असून त्यात दुलारी नावाच्या महिलेच्या पतीचे नाव ‘राम’ आहे. यात राम नावाच्या पात्राला प्रभु श्रीरामाच्या रूपात दाखवून त्यांचा अवमान करण्यात आला आहे. हिंदु जनजागृती समितीकडून प्रभु श्रीरामाच्या अवमानाचा निषेध करण्यात आला आहे. याला वैध मार्गाने विरोध करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
मालिकेतून करण्यात आलेला अवमान !
यामध्ये राम आणि दुलारी दुचाकीवरून जातांना राम रस्त्यावरील तरुणींकडे आकर्षित होतांना दाखवले आहे. त्या वेळी पत्नी दुलारी म्हणते, ‘माझ्या पती राममध्ये महिलांना पुरुष उत्तम (पुरुषोत्तम) दिसतात, तर मला तरुणींमध्ये शूर्पणखा!’ त्यावर या तरुणी म्हणतात, ‘‘आता नाक किंवा डोके कापले गेले, तरी हृदयामध्ये केवळ रामच !’’
एका प्रसंगात दुलारी म्हणते की, ‘माझ्या रामाला वाचवण्यासाठी प्रत्येक लक्ष्मणरेषा मी पार करीन.’
हिंदु धर्मप्रेमी पुढील संपर्कावर वैध मार्गाने निषेध नोंदवत आहेत.
ट्विटर : twitter.com.ZeeTV
फेसबूक : facebook.com/ZeeTVIndia/
इन्टाग्राम : instagram.com/zeetv/?hI=en
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात