Menu Close

ॐच्या पायजम्याचे छायाचित्र पोस्ट करणार्‍या अभिनेत्री अंकिता लोखंडे यांना नेटकर्‍यांनी सुनावले

हिंदूंनाच त्यांच्या धर्मचिन्हांचे महत्त्व नसणे, हा त्यांना धर्मशिक्षण न दिल्याचा परिणाम होय. यातून हिंदूंना धर्मशिक्षणाची असलेली आवश्यकता लक्षात येते !

तरुण पिढी चित्रपट कलाकारांचे अनुकरण करत असते. त्यामुळे धर्माचा अवमान करणार्‍या अभिनेत्रींनी चुकीसाठी क्षमायाचना केली पाहिजे !

मुंबई : अभिनेत्री अंकिता लोखंडे यांनी ॐ लिहिलेला पायजमा घालून स्वत:चे छायाचित्र इन्स्टाग्राम या सामाजिक प्रसारमाध्यमावर प्रसारित केले. यावरून अनेक नेटकर्‍यांनी त्यांना खडे बोल सुनावले. ॐ हे धार्मिक चिन्ह असल्यामुळे त्याचे चित्र असलेला पायजमा परिधान करणे योग्य नसल्याचे त्यांच्या काही समर्थकांनीही लक्षात आणून दिले आहे.

याविषयी एका युवतीने दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे की, ॐ चे चिन्ह तुमच्या पायांना लागत आहे. ईश्‍वराचे नाम किंवा धार्मिक चिन्ह यांचा अशा प्रकारे उपयोग करणे, हे अत्यंत चुकीचे आहे. अन्य एका समर्थकाने अशा प्रकारे भगवंताचा अवमान करू नका, असे म्हटले आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *