चीनच्या तालावर नाचणार्या नेपाळमधील सत्ताधारी नेपाळ कम्युनिस्ट पक्षाला वेळीच धडा शिकवला नाही, तर तो भारताच्या शेजारी आणखी एक मोठी डोकेदुखी निर्माण करील, हे सरकारने लक्षात घेऊन हा पक्ष नामशेष करण्यासाठी वेळीच पावले उचलायला हवीत !
काठमांडू : नेपाळने भारताच्या उत्तरराखंड राज्यातील डेहरादून आणि नैनीताल हेही त्यांचेच भाग असल्याचा दावा केला. नेपाळमधील सत्ताधारी नेपाळ कम्युनिस्ट पक्षाकडून ‘युनिफाइड नेपाळ नॅशनल फ्रंट’ या संघटनेसमवेत ‘ग्रेटर नेपाळ’ नावाचे एक अभियान राबवले जात असून त्यात भारतातील वरील भागांसह हिमाचल प्रदेश, उत्तरप्रदेश, बिहार आणि सिक्किम या राज्यांतील अनेक भाग त्याचेच असल्याचा दावा केला आहे.
‘ग्रेटर नेपाळ’ या आधारहीन आणि दिशाभूल करणार्या संकल्पनेला पुष्टी देण्यासाठी नेपाळकडून वर्ष १८१६ मध्ये झालेल्या ‘सुगौली करारा’पूर्वीचा नेपाळचा नकाशा दाखवला जात आहे. याद्वारे नेपाळी नागरिकांना भ्रमित करण्याचा प्रयत्न नेपाळ सरकार करत आहे. या अभियानाला पाककडून सातत्याने खतपाणी घातले असून ‘ग्रेटर नेपाळ यू ट्युब चॅनल’वरही पाकिस्तानी युवक भारतविरोधी गरळओक करत आहेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात