-
देहली पोलिसांचे न्यायालयात संतापजनक उत्तर
-
आरोपी सुष्मिता सिंह यांच्यावर कारवाई करण्यासही नकार
देहली पोलीस केंद्रातील भाजप सरकारच्या अखत्यारीत येत असतांना त्यांच्याकडून अशा प्रकारचे उत्तर मिळणे, हे हिंदूंना अपेक्षित नाही. देहली पोलिसांच्या या असंवेदनशीलतेची केंद्र सरकारने चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी ! हिंदूबहुल भारतात अशा घटना घडणे हिंदूंना लज्जास्पद !
कुठे कुराणाची पाने फाडण्यात आल्याच्या अफवेवरही कायदा हातात घेणारे धर्मांध, तर कुठे स्वतःच स्वतःच्या धार्मिक ग्रंथांचा अवमान करणारे हिंदू !
नवी देहली : पत्रकार सुष्मिता सिंह या तरुणीने सणांच्या वेळी हिंदूंच्या एका धार्मिक पुस्तकाद्वारे शौचालय स्वच्छ करण्यास सांगणारा व्हिडिओ बनवून तो प्रसारित केला होता. त्याविरोधात ‘हिंदु आयटी सेल’चे सदस्य राजकुमार गुप्ता यांनी सुष्मिता सिंह यांच्या विरोधात देहली पोलिसांच्या गोविंदपुरी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली; मात्र पोलिसांनी सिंह यांच्यावर कोणताही गुन्हा नोंद केला नाही. पोलीस अधिकार्याने सांगितले की, ‘धार्मिक पुस्तकाचा ‘टॉयलेट पेपर’सारखा वापर करण्यात काहीही चुकीचे नाही.’
या प्रकरणी देहलीतील साकेत जिल्हा न्यायालयात अहवाल सादर करण्यात आला. त्यात पोलिसांनी म्हटले की, ‘हिंदु देवतांचा अवमान करण्याविषयी महिला पत्रकाराच्या विरोधात करण्यात आलेल्या तक्रारीविषयी कोणताही गुन्हा आढळून आलेला नाही. या व्हिडिओमध्ये आम्हाला अयोग्य काहीच वाटले नाही.’
दुसरीकडे उत्तरप्रदेश पोलिसांनी हिर खान नावाच्या महिलेच्या विरोधात अशा प्रकारचा एक व्हिडिओ बनवून हिंदु देवतांचा अवमान केल्यामुळे कारवाई करत तिला अटक केली होती. (भाजपच्या उत्तरप्रदेशात अशा प्रकारची कारवाई होऊ शकते, तर देहलीमध्ये का नाही ? देहलीमध्ये कायदे वेगळे आहेत का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात