Menu Close

बांदा (उत्तरप्रदेश) येथील बामदेवेश्‍वर पर्वतावर धर्मांधांनी अतिक्रमण करून बांधली मशीद

पोलीस आणि प्रशासन निष्क्रीय

  • मशीद बांधेपर्यंत सरकारी यंत्रणा, पोलीस आणि हिंदू झोपले होते का ?
  • उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे राज्य असतांना हिंदूंच्या प्राचीन श्रद्धास्थानांवर धर्मांध अतिक्रमण करून मशीद कसे बांधू शकतात ?, असा प्रश्‍न हिंदूंच्या मनात निर्माण होतो !
  • राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तात्काळ या घटनेची नोंद घेऊन हे अतिक्रमण पाडावे, असे हिंदूंना अपेक्षित आहे !

बांदा (उत्तरप्रदेश) : येथील बामदेवेश्‍वर पर्वतावर धर्मांधांनी अतिक्रमण करून तेथे मशीद बांधली आहे. २ वर्षांपूर्वी येथे काही धर्मांध आले आणि त्यांनी हिंदूंना धमकावले की, ‘ही भूमी आमच्या पूर्वजांची असून येथे त्यांचे मृतदेह पुरलेले आहेत. आम्ही येथे त्यांची मजार बनवणार आहोत. तुम्ही ही जागा सोडली नाही, तर तुमची मुले वेडी होतील आणि मरून जातील.’ या भीतीमुळे हिंदूंनी ही जागा सोडली आणि नंतर धर्मांधांनी तेथे मशीद बांधली. आता ते आणखी ३-४ मशिदी बांधण्याच्या सिद्धतेत आहेत. विशेष म्हणजे या पर्वताच्या परिसरात एकही मुसलमान रहात नाही. पूर्वी येथे एकही घर नव्हते, आता आजूबाजूला अवैधरित्या जागा बळकावून घरे बांधली जात आहेत. या पर्वताच्या पायथ्याशीही मशीद बांधण्यात येत आहे.

१. पर्वतावरील मशिदीमध्ये नमाजपठण करण्यात येते. धर्मांध रात्रीच्या वेळी येथे येतात आणि सकाळी निघून जातात. ही सरकारी भूमी असूनही प्रशासनाकडून यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही अथवा पोलिसांकडून काहीही चौकशी करण्यात आलेली नाही.

२. याविषयी विश्‍व हिंदु परिषदेचे शहराध्यक्ष महेंद्र चौहान यांनी सांगितले की, या पर्वतावर पूर्वी कधीही मशीद नव्हती. हे हिंदूंचे श्रद्धास्थान होते. त्यामुळे येथे मशीद बांधली जाणे, याचा अर्थ काही जण शांततेने राहू इच्छित नाहीत.

बामदेवेश्‍वर पर्वताचा इतिहास

बामदेवेश्‍वर पर्वत हे प्राचीन ठिकाण आहे. येथे शिवमंदिर आहे. या पर्वतावरील गुहेमध्ये बसून बामदेव ऋषींनी तपस्या केली होती आणि शिवलिंगाची स्थापना केली होती. बामदेव ऋषींमुळेच या शहराला ‘बांदा’ असे नाव पडले आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *