Menu Close

पाकमध्ये दूरचित्रवाहिनीवरील कार्यक्रमात तेथील अल्पसंख्य हिंदूंना कुत्रा संबोधले !

हिंदूंवरील या शेरेबाजीवर प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून दाद दिली हा आहे पाकचा हिंदुद्वेष ! पाकमधील हिंदूंची परवड केंद्रशासन कधी रोखणार ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात

इस्लामाबाद : येथील दूरचित्रवाहिनीवरील एका कार्यक्रमात विनोद करतांना हिंदुद्वेषी निवेदकाने पाकिस्तानातील अल्पसंख्य हिंदूंविषयी आक्रमक आणि अपमानास्पद शेरेबाजी करत त्यांना कुत्रा असे संबोधले. या शेरेबाजीवर उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. (यावरून पाकमध्ये हिंदूंना कसे वागवले जात असेल, याची कल्पना येते ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) याविषयीचे वृत्त येथील द नेशन या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले असून या वृत्तपत्रानेही संबंधित दूरचित्रवाहिनीवर टीकेची झोड उठवली आहे.

या वृत्तात पुढे म्हटले आहे की, जेव्हा या कार्यक्रमातील निवेदक हिंदूंविषयी कुत्रा यांसारख्या चुकीच्या शब्दांचा वापर करत होते, तेव्हा कार्यक्रमातील दर्शक मोठमोठ्याने हसत होते. दुर्दैवाने पाकिस्तानात पाठ्यपुस्तकांपासून टॉक शो पर्यंत हिंदूंना अपवित्र आणि हीन समजले जाते. मुसलमान येण्याच्या सहस्रावधी वर्षांपूर्वीपासून पाकमध्ये हिंदू रहात होते. तरीही मुसलमान हिंदूंशी कसा व्यवहार करत आहेत ? याचे त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची खरी आवश्यकता आहे. अशा धर्माच्या अनुयायांना सार्वजनिकपणे अपमानित करणे अतिशय अयोग्य आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *