Menu Close

उमरकोट (पाकिस्तान) येथे सरकारने हिंदूंची घरे बुलडोजर चालवून पाडली

  • पाकमध्ये हिंदू असणे हा सर्वांत मोठा गुन्हा झाला आहे. या गुन्ह्यासाठी धर्मांधांकडून थेट शिक्षा होत असते. त्यातलाच हा एक भाग आहे, असेच म्हणावेसे वाटते !
  • जगात कुठल्याही मुसलमान अथवा ख्रिस्ती यांच्यावर धर्माच्या आधारे अन्याय, अत्याचार होत असेल, तर जगभरातील ख्रिस्ती आणि मुसलमान संघटित होऊन त्याचा विरोध करतात; मात्र भारतातील हिंदू आणि आतापर्यंतचे शासनकर्ते यांनी देशातील हिंदूंसाठी काही केले नाही आणि ते अन्य देशांतील हिंदूंसाठी काही करतील, अशी अपेक्षाही करता येत नाही !

उमरकोट (पाकिस्तान) : पाकच्या सिंध प्रांतातील उमरकोट जिल्ह्यातील चोर भागामध्ये हिंदूंच्या घरांना सरकारकडून पाडण्यात आल्याच्या घटनांचे २ व्हिडिओ पाकिस्तानी लेखक आणि पत्रकार राहत ऑस्टिन यांनी ट्वीट केले आहेत. घरे पाडण्यामागील कारण मात्र ऑस्टिन यांनी दिलेले नाही.

१. ऑस्टिन यांनी यात म्हटले आहे की, नुकतेच पाकमध्ये आलेल्या पुरामुळे मुसलमानेतर लोकांची स्थिती वाईट झालेली आहे. त्यांना पाक सरकारच नाही, तर खासगी संस्थांकडूनही कोणतेही साहाय्य मिळालेले नाही. त्यातच आता उमरकोट येथील चोर भागामध्ये हिंदूंच्या घरांवर बुलडोजर चालवण्यात येत आहेत. कोरोनाच्या अनुषंगाने दळणवळण बंदीच्या वेळी मुसलमेनतरांचे धर्मांतर करण्यासाठी अशा प्रकारचे प्रयत्न केले गेले होते.

२. राहत यांनी पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमध्ये एक व्यक्ती म्हणत आहे की, ‘केवळ हिंदूंच्या घरावर बुलडोजर चालवण्यात येत आहे.’

३. यापूर्वी मे मासामध्ये पंजाब प्रांतातील बहावलपूरमध्ये पाकचे गृहमंत्री तारिक बशीर चिमा यांच्या नेतृत्वाखाली हिंदूंच्या घरांवर बुलडोजर चालवून ते पाडण्यात आले होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *