विरोधी पक्षांकडून सीबीआय चौकशीची मागणी
- ‘आंध्रप्रदेशमध्ये ख्रिस्तीधार्जिणा वाय.एस्.आर्. काँग्रेस पक्ष सत्तेत असल्यानेच अशा घटना घडत आहेत’, असे कुणाला वाटल्यास चुकीचे काय ? आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी हे स्वतः ख्रिस्ती असल्याने या घटनेत कुणाला शिक्षा होणे सोडाच; पण या प्रकरणाचे अन्वेषण तरी निष्पक्ष होईल का ?, याची हिंदूंच्या मनात साशंकता आहे !
- कधी मशीद किंवा चर्च यांमध्ये चोरी झाल्याच्या बातम्या ऐकायला मिळतात का ? हिंदुबहुल भारतात मात्र हिंदूंच्याच मंदिरांत चोर्या होतात आणि कुठलेही सरकार याकडे गांभीर्याने पहात नाही, हे लक्षात घ्या आणि ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करा !
विजयवाडा (आंध्रप्रदेश) : येथील श्री कनकदुर्गा मंदिराच्या प्रांगणातील ‘अम्मावरी रथम्’च्या (‘पवित्र रथा’च्या) ४ कोपर्यांत असलेल्या सिंहाच्या चांदीच्या प्रतिमांपैकी ३ कोपर्यांतील सिंहाच्या प्रतिमा चोरीस गेल्या आहेत. प्रत्येक प्रतिमा ३ किलो चांदीपासून बनवलेली होती. या प्रकरणी विरोधी पक्ष असलेल्या टीडीपी पक्षाने सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.
टीडीपीचे आमदार बुद्धा वेंकन्ना म्हणाले, ‘‘या घटनेमुळे पूर्ण हिंदु समाज दुःखी असून त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. या प्रकरणी मंदिरातील कार्यकारी अधिकार्यांनी योग्य माहिती दिलेली नाही, तसेच घटना घडल्याचे लक्षात आल्यावर पोलिसांनाही तात्काळ कळवले नाही. कार्यकारी अधिकार्यांकडून आरोपींना वाचवण्याचे प्रयत्न चालू आहेत. त्यामुळे या प्रकरणी सरकारने खुलासा केला पाहिजे आणि आरोपींना तात्काळ अटक केली पाहिजे. वाय.एस्.आर्. काँग्रेसचे नेते मंदिराच्या गर्भगृहातील प्रतिमा लुटण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहेत. या सर्व प्रकरणात राज्याचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी बाळगलेले मौन आश्चर्यकारक आहे. काही लोक मंदिराला दान मिळालेल्या भूमी लूटण्याचा प्रयत्न करत आहेत. राज्यात मंदिरांवर आक्रमणे होत आहेत. मंदिराचे अधिकारी तथा मंत्री वेल्लमपल्ली श्रीनिवास यांना चोर कोण आहे, ते ठाऊक असून त्यांनी याविषयी धारण केलेले मौन सोडले पाहिजे.’’
श्री कनकदुर्गा मंदिराचे महत्त्व
दक्षिण भारतातील प्रमुख मंदिरांपैकी श्री कनकदुर्गा मंदिर हे एक आहे. अर्जुनाने भगवान शिवाची कठोर तपश्चर्या केल्यानंतर त्याला भगवान शिवाकडून पाशुपत अस्त्र याच मंदिरात प्राप्त झाले. श्री कनकदुर्गा मंदिर हे अर्जुनाने बांधल्याचे सांगितले जाते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात