- मुळात केंद्र सरकारनेच अशा प्रकारचा कठोर कायदा बनवण्याची आवश्यकता आहे. ज्यामुळे ख्रिस्ती मिशनरी आणि धर्मांध यांच्याकडून होणारे हिंदूंचे धर्मांतर रोखता येईल !
- ‘लव्ह जिहाद’च्या घटना रोखण्यासाठी सरकारी स्तरावर प्रयत्न हवेतच. त्यासह हिंदु युवतींना धर्मशिक्षण देण्याची तरतूद सरकारने करावी, जेणेकरून हिंदु युवती धर्मांधांच्या फसव्या प्रेमाला बळी पडणार नाहीत !
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) : लव्ह जिहादच्या संदर्भात उत्तरप्रदेश सरकार लवकरच धर्मांतराविषयी अध्यादेश काढण्याची शक्यता आहे. ‘अन्य राज्यांमध्ये धर्मांतराच्या विरोधात बनवण्यात आलेले कायदे आणि अधिनियम यांचा अभ्यास करण्यात येत आहे. यानंतर उत्तरप्रदेश सरकार याविषयी स्वतःचा कायदा बनवेल’, असे राज्याच्या वरिष्ठ अधिकार्यांनी सांगितले. सध्या देशातील ८ राज्यांमध्ये धर्मांतरविरोधी कायदे आहेत. यांत उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, ओडिशा, मध्यप्रदेश आणि गुजरात यांचा समावेश आहे.
उत्तरप्रदेशातील कानपूर येथे लव्ह जिहादच्या १२ हून अधिक घटना विशेष अन्वेषण पथकाने शोधून काढल्या आहेत. या प्रकरणांविषयी राज्याच्या दौर्यावर येऊन गेलेले सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनीही चिंता व्यक्त केली होती. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने याला रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे ठरवले आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात