सांगली : काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत हिंदु मुली गायब होत असतांना आम्हाला मात्र दूरचित्रवाहिनीवरील ‘देवयानी’चे काय होणार ? हे महत्त्वाचे वाटते.
भारतीय संस्कार, भारतीय संस्कृती यांची मृत्यूघंटा वाजत आहे, अशी स्थिती आहे.
भारतीय संस्कृतीत स्त्रीमुक्तीच्या डांगोऱ्या ची आवश्यकता नाही. त्यामुळे भारतीय स्त्रीचे दिसणे महत्त्वाचे नसून तिचे घरातील अस्तित्वच महत्त्वाचे आहे, असे मत सोलापूर येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अधिवक्त्या (श्रीमती) अपर्णा रामतीर्थकर यांनी व्यक्त केले.
त्या लोकमान्य टिळक स्मारक येथे ‘सत्यवेध फाऊंडेशन’च्या वतीने आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या.
या वेळी ‘क्रेझी आयस्क्रीम’चे श्री. संताजी कदम आणि श्री. महेश पाटील यांना उद्योगभूषण पुरस्कार देण्यात आला.
या वेळी ‘सत्यवेध फाऊंडेशन’चे श्री. राहुल कुलकर्णी, चितळे उद्योग समूहाचे श्री. गिरीष चितळे यांसह कार्यक्रमासाठी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात