Menu Close

पाकिस्तानमध्ये ८२ टक्के प्रकरणांत वडील, भाऊ, काका, आजोबा यांच्याकडून होतो तरुणींवर बलात्कार !

सत्ताधारी ‘तहरीक-ए-इंसाफ’च्या खासदार शंदाना गुलजार यांचा दावा

  • वाधनांध धर्मांध स्वतःच्या घरातील मुलींवरही बलात्कार करतात. यातून त्यांची आसुरी मानसिकता लक्षात येते ! पाक एक इस्लामी राष्ट्र असूनही तेथे अशा घटनांसाठी शरीयतनुसार कठोर शिक्षा केली जात नाही. याचाच अर्थ ते धर्माच्या नावाखाली केवळ ढोंगीपणाच करतात, हे लक्षात येते !
  • भारतात अशा प्रकारच्या घटना घडत नाहीत ना, याचा शोध अन्वेषण यंत्रणांनी, तसेच महिला संघटना अन् मानवाधिकार संघटना यांनी घेतला पाहिजे !

इस्लामाबाद (पाकिस्तान) : पाकमधील सत्ताधारी पक्ष ‘तहरीक-ए-इंसाफ’च्या खासदार शंदाना गुलजार यांनी पाक सरकारकडे देशात होणार्‍या बलात्काराच्या मूळ कारणांचा शोध घेण्याची मागणी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, ‘देशातील ८२ टक्के बलात्काराच्या घटनांत पीडितेच्या घरातीलच सदस्य, उदा. वडील, भाऊ, आजोबा किंवा काका हे तिच्यावर बलात्कार करतात.’ त्या एका वृत्तवाहिनीवरील चर्चासत्रात बोलत होत्या.

१. गुलजार यांनी ‘राइट्स ग्रुप वॉर ऑन रेप’ या संस्थेने दिलेल्या आकडेवारीच्या आधारे वरील दावा केला. गुलजार यांनी पत्रकार हामिद मीर यांच्या कार्यक्रमामध्ये दावा करतांना म्हटले की, जेव्हा अशा तरुणी गर्भवती होतात, तेव्हा त्यांची आई भीतीपोटी त्यांना पोलीस ठाण्यात घेऊन जात नाही; कारण यामुळे तिच्या पतीला अटक होऊन तो कारागृहात जाऊ शकतो. त्यामुळे त्या मुलींचे गर्भपात करण्यासाठी स्त्रीरोग तज्ञांकडे घेऊन जातात.

२. खासदार गुलजार यांनी म्हटले की, बलात्कार समाजातील सर्वांत वाईट घटनांपैकी एक आहे. याविरोधात मी गेल्या ३ वर्षांपासून लढा देत असून कुणीही याविषयी बोलण्यास सिद्ध नाही. जर शासन बलात्काराच्या या कारणांवर लक्ष देण्यास सिद्ध असेल, तर समाज उन्नती करील आणि स्त्रियांवरील गुन्हेगारी कायम ठेवणार्‍या पुरुषप्रधान संस्कृतीचा प्रतिकार करील.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *