डिसेंबर २०१७ मध्ये ९ रिश्टर स्केलहून अधिक तीव्रतेच्या भूकंपाची शक्यता
रुडकी (हरिद्वार) : जेव्हा सर्व ग्रह एका बाजूने आणि चंद्र दुसर्या बाजूने होतो, अशा स्थितीत भूकंप होतो. या वर्षी अशा प्रकारचा योग २९ मे आणि १७ सप्टेंबर या दिवशी, तसेच डिसेंबर २०१७ मध्ये निर्माण होत आहे. त्यामुळे या तिन्ही दिवशी मोठे भूकंप होण्याची शक्यता आहे, अशी भविष्यवाणी येथील अखिल भारतीय ज्योतिष, धर्म आणि अध्यात्म महासंमेलनामध्ये सहभागी झालेल्या काही ज्योतिषांनी केली आहे.
१. देहलीतील फ्यूचर पॉईंट अखिल भारतीय ज्योतिष संस्थेचे अध्यक्ष अरुण बन्सल यांनी सांगितल्यानुसार २९ मे २०१६ या दिवशी होणार्या भूकंपाचे केंद्र भूमध्य रेषेजवळ असल्याने भूकंपाचा सर्वाधिक परिणाम इंडोनेशिया आणि श्रीलंका या देशांवर होईल.
२. १७ सप्टेंबर २०१६ या दिवशी भूकंप होण्याची शक्यता असून त्याचे केंद्र उत्तर भारतात असेल.
३. ३ डिसेंबर २०१७ या दिवशी होणारा भूकंप रिश्टर स्केलनुसार ९ हून अधिक तीव्रतेचा असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भूकंपात मोठ्या प्रमाणात विध्वंस होण्याची शक्यता आहे. या भूकंपाचे केंद्रही हिमालयात असणार आहे.
४. विज्ञानात सांगितल्याप्रमाणे पृथ्वीच्या आतील प्लेट आपसात धडकल्यामुळे भूकंप येतो, असे समजण्यात येते, तर ज्योतिषशास्त्रानुसार भूकंपासाठी ग्रहांच्या स्थितीला उत्तरदायी धरण्यात येते.
महर्षींनी प्रलयकालाविषयी सतर्क करणे
१९.३.२०१६ या दिवशी झालेल्या नाडीवाचन क्रमांक ६७मध्ये महर्षि म्हणतात, हे पूर्ण वर्ष प्रलयकालाचे आणि आपत्तीजनक असणारे आहे. (ज्योतिषी आज करत असलेल्या दाव्याविषयी महर्षींनी सहस्रोवर्षांपूर्वीच लिहून ठेवले आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात