Menu Close

मुख्तार अहमद याने ‘राहुल विश्‍वकर्मा’ नाव सांगत हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे केले धर्मांतर !

कानपूर येथे लव्ह जिहादची आणखी एक घटना उघड

निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी ‘लव्ह जिहाद’ असा काही प्रकार अस्तित्वात नाही’, असे नेहमीच सांगतात; मात्र ‘धर्म पालटून हिंदु मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढणे आणि त्यांचे धर्मांतर करणे’, याविषयी ते मौन बाळगतात, हे लक्षात घ्या !

कानपूर (उत्तरप्रदेश) : लव्ह जिहाद्यांचा अड्डा झालेल्या कानपूरमध्ये आणखी एक लव्ह जिहादची घटना समोर आली आहे. येथील नौबस्ता येथे मुख्तार अहमद या विवाहित तरुणाने स्वतःचे ‘राहुल विश्‍वकर्मा’ असे नाव सांगत एका हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि तिचे धर्मांतर करून तिच्याशी विवाह केला.

याची माहिती दोघांच्या घरी त्यांनी दिली नाही. ते स्वतःच्याच घरात रहात होते. या काळात या तरुणीला त्याचे खरे नाव, धर्म आणि तो विवाहित असून त्याला मुलेही असल्याचे समजले. त्याची पत्नीही दुसर्‍या धर्मातील आहे. यानंतर या तरुणीने मुख्तारच्या विरोधात तक्रार प्रविष्ट केली. पोलिसांनी हे प्रकरण लव्ह जिहादच्या घटनांचे अन्वेषण करणार्‍या विशेष अन्वेषण पथकाकडे सोपवले आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *