पणजी : ‘लव्ह जिहाद’ हा अनेक वर्षे समाजासाठी अभिशाप ठरला आहे आणि आता याविषयी उघडपणे बोलले जात आहे, असे विधान राज्यसभेचे खासदार विनय तेंडुलकर यांनी केले आहे. ‘लव्ह जिहाद’मुळे आम्ही अनेक बहिणी आणि मुली गमावल्या आहेत. प्रत्येकाला त्याचा जीवनसाथी निवडण्याचा अधिकार आहे; मात्र जीवनसाथी निवडतांना त्याची पार्श्वभूमी प्रत्येकाने पडताळून पाहिली पाहिजे, असे विधान राज्यसभेचे खासदार विनय तेंडुलकर यांनी ट्वीट करून केले आहे.
‘लव्ह जिहाद’ या विषयावर सार्वजनिकरित्या मत व्यक्त करणारे राज्यसभेचे खासदार विनय तेंडुलकर हे भाजपचे गोव्यातील पहिले नेते ठरले आहेत. यापूर्वी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांशी बोलतांना सांखळीचे तत्कालीन आमदार आणि विद्यमान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ‘हिंदु जनजागृती समितीने गोव्यातील ‘लव्ह जिहाद’च्या प्रकरणांत लक्ष घातले पाहिजे’, अशा आशयाची सूचना केली होती.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात