‘नेटफ्लिक्स’वरून प्रसारित होणार्या बहुतेक वेब सिरीजमध्ये हिंदूंच्या देवता, धर्म आदींचा अवमान केला जातो, हे उघड झाले आहे आणि आता हिंदूंचे एकप्रकारे धर्मांतर करण्याचा प्रयत्न यातून होत आहे. आतातरी केंद्र सरकारने अशा वेब सिरीजवर नियंत्रण ठेवणारा कायदा करावा, असे हिंदूंना वाटते !
मुंबई : ‘नेटफ्लिक्स’ या ‘ओटीटी अॅप’वर रवींद्रनाथ टागोर यांची कथा ‘काबुलीवाला’वर आधारित एक वेब सिरीज प्रदर्शित होत आहे. यातील एका दृश्यामध्ये ‘मिनी’ नावाची हिंदु मुलगी नमाजपठण करतांना दिसत आहे.
तिचा मित्र काबुलीवाला तिला भेटण्यासाठी बर्याच दिवसांत आला नव्हता. तो तिला भेटण्यासाठी यावा; म्हणून ती अल्लाला प्रार्थना करतांना दिसत आहे. टागोर यांच्या मूळ काबुलीवाला कथेमध्ये कुठेही नमाजपठण करणार्या हिंदु मुलीचा उल्लेख नाही. म्हणजेच मालिकेच्या निर्मात्याने जाणीवपूर्वक हा प्रसंग यात घातला आहे. (याच्या उलट हिंदु मित्र भेटायला आला नाही; म्हणून मुसलमान मुलगी मंदिरात प्रार्थना करत असतांनाचे दृश्य दाखवण्याचे धाडस मालिकेची निर्मिती करणारे का करत नाही ? – संपादक,दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात