धर्मरक्षणासाठी तत्पर असणार्या हिंदु जनजागृती समितीचे अभिनंदन !
अमरावती : ‘चिप्पा ३’ या वेबसीरिजमध्ये एक धर्मांध त्याच्या नातवाला हनुमानाची गोष्ट सांगत असल्याचे दाखवले आहे. त्यात हनुमानाविषयी अयोग्य पद्धतीचे प्रसंग दाखवण्यात आले असल्याने त्याची एकप्रकारे विटंबनाच होत आहे. यातून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्यामुळे येथील हिंदु जनजागृती समितीचे श्री. नीलेश टवलारे यांनी या वेबसिरीजच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली असून ‘या वेबसिरीजवर बंदी घालावी’, अशी मागणी करण्यात आली आहे.
(म्हणे) ‘हिंदूंनी त्यांच्या धार्मिक भावनांना आवर घालायला हवा !’
श्री. नीलेश टवलारे तक्रार देण्यासाठी गेल्यावर पोलीस निरीक्षकाने प्रथम तक्रार न घेता ‘अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करावे. तुमच्या भावनांना आवर घालायला हवा’, असा सल्ला दिला. त्यावर श्री. टवलारे यांनी त्यांना समजावल्यावर पोलीस निरीक्षक तक्रार घेण्यास सिद्ध झाले. (प्रत्येक वेळी हिंदूंनी त्यांच्या धार्मिक भावनांना आवर घालायचा आणि धर्मांधांनी हिंदूंच्या धार्मिक भावना पायदळी तुडवायच्या, हा कुठला न्याय ? धर्मांधांची उघडउघड बाजू घेणार्या पोलिसांना वेळीच खडसवा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात