अशा प्रकारे धर्मांधांकडून होणार्या हिंदु तरुणींच्या फसवणुकीविषयी निधर्मीवादी तोंड का उघडत नाहीत ?
बिलासपूर (छत्तीसगड) : येथील एक हिंदु तरुणी आणि तिच्या दोघा बहिणींना मुसलमान तरुणांनी स्वतःचे हिंदु नाव सांगून प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यांना नोकरी देण्याच्या आमीषाने उत्तरप्रदेशची राजधानी लक्ष्मणपुरी येथे बोलावले आणि त्यांच्यावर सामूहिक बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी शकील, इम्रान आणि नूर आलम यांपैकी दोघांना अटक केली आहे.
या धर्मांधांनी एक वर्षांपूर्वी दूरभाषद्वारे संपर्क करून या तरुणींशी मैत्री केली होती. नंतर त्यांना विवाहाचे आणि नोकरीचे आमीष दाखवले होते. त्यांना लक्ष्मणपुरी येथे बोलावल्यावर एका खोलीत बंद करून ठेवले आणि त्यांच्याकडील पैसे काढून घेतले. यानंतर ९ तरुणांना त्यांच्यावर बलात्कार करण्यासाठी पाठवले. यातून त्या कशाबशा निसटल्या आणि पोलिसांना याची माहिती दिली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात