Menu Close

नेपाळच्या हितासाठी नेपाळला पुन्हा एकदा ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करा : कमल थापा, माजी उपपंतप्रधान

  • यासाठी भारत सरकारनेही प्रयत्न करावेत, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !
  • नेपाळचे माजी उपपंतप्रधान अशी मागणी करतात; मात्र भारतात एकही माजी किंवा आजी मंत्री अथवा लोकप्रतिनिधी मागणी करत नाही, हे लक्षात घ्या !
  • जगात ख्रिस्ती, मुसलमान, बौद्ध आदी धर्मियांसाठी अनेक स्वतंत्र देश आहेत; पण भारत आणि नेपाळ या देशांत बहुसंख्य असलेल्या हिंदूंना संपूर्ण पृथ्वीतलावर स्वतःचे स्वतंत्र असे एकही राष्ट्र नाही. हे हिंदूंना लज्जास्पद ! यासाठी हिंदूंनी आता तरी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी संघटित झाले पाहिजे !

महाराजगंज (नेपाळ) : नेपाळच्या हितासाठी नेपाळला पुन्हा एकदा ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करावे, अशी मागणी नेपाळमधील ‘राष्ट्रीय प्रजातंत्र पक्षा’ नेते तथा नेपाळचे माजी उपपंतप्रधान कमल थापा यांनी १९ सप्टेंबर या दिवशी झालेल्या ‘संविधान दिवसा’निमित्त केली. नेपाळला पुन्हा हिंदु राष्ट्र घोषित करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रीय प्रजातंत्र पक्षाचे कार्यकर्ते स्वाक्षरी चळवळ राबवत आहेत. विश्‍व हिंदु परिषद, नेपाळचे सचिव जितेंद्र कुमार म्हणाले की, ‘नेपाळमध्ये ८१.३ टक्के हिंदू आहेत. नेपाळला असलेला हिंदु राष्ट्र’चा दर्जा काढून घेऊन नेपाळच्या मूळ प्रकृतीची मोडतोड करण्यात आली. नेपाळला पुन्हा एकदा हिंदु राष्ट्राचा दर्जा देण्याची हीच वेळ आहे.’

नेपाळ वर्ष २००८ मध्ये घोषित झाले होते ‘धर्मनिरपेक्ष राष्ट्र’

वर्ष २००६ मध्ये माओवाद्यांनी केलेल्या आंदोलनानंतर नेपाळमधील व्यवस्था पालटण्याच्या प्रक्रियेला गती आली आणि ‘हिंदु राष्ट्र’ असलेले नेपाळ वर्ष २००८ मध्ये ‘धर्मनिरपेक्ष राष्ट्र’ घोषित करण्यात आले.

नेपाळमधील धर्मनिहाय लोकसंख्या

नेपाळमध्ये सध्या हिंदूंची लोकसंख्या ८१.३ टक्के, बौद्धांची ९.९ टक्के, मुसलमानांची ४.४. टक्के, किराटिस्ट (स्थानिक धर्म) यांची ३.३, ख्रिस्त्यांची १.४ टक्के, तर शिखांची ०.२ टक्के लोकसंख्या आहे.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून नेपाळी जनतेला साहाय्याची अपेक्षा ! – विश्‍व हिंदु परिषद, नेपाळ

विश्‍व हिंदु परिषद, नेपाळचे सचिव जितेंद्र कुमार पुढे म्हणाले की, नेपाळला पुन्हा एकदा हिंदु राष्ट्र घोषित करण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे नेपाळला साहाय्य करतील, अशी अपेक्षा नेपाळी जनता बाळगून आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *