Menu Close

बुलढाणा जिल्ह्यातील जामोद येथे धर्मांधांनी सुरुंग लावून मंदिर पाडले !

महिलांच्या मंदिर प्रवेशाला वारेमाप प्रसिद्धी देणारी प्रसारमाध्यमे,  तसेच दादरी प्रकरणावरून ऊर बडवणारे ढोंगी निधर्मीवादी मंदिरांवरील आक्रमणाविषयी मात्र मौन बाळगतात, हे लक्षात घ्या ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

  • मूर्तींची तोडफोड
  • श्रीरामनवमीचा भंडारा उधळला
  • हिंदूंची घरे लुटली
  • संचारबंदी लागू
  • शिवसैनिकांचे साहाय्य
  • ८७ धर्मांधांवर कारवाई

dharmandh2बुलढाणा : जिल्ह्यातील जळगाव-जामोद येथे १६ एप्रिलच्या रात्री धर्मांधांनी प्राचीन बेंबळेश्‍वराचे मंदिर सुरूंग लावून पाडले आणि श्रीरामनवमीचा भंडारा उधळला. गावातील अनेक मंदिरांतील मूर्तींची विटंबना केली. हिंदूंची घरे लुटण्यात आली, दुकाने पेटवण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी ८७ धर्मांधांना कह्यात घेतले असून गावात संचारबंदी लागू करण्यात आली आहे, असे वृत्त दैनिक सामनाने प्रसिद्ध केले आहे.

१. जामोद येथे श्रीरामनवमीनिमित्ताने प्रतिवर्षी भंडारा आयोजित करण्यात येतो. या महाप्रसादासाठी संपूर्ण गावातून भाकर्‍या गोळा करण्यात येतात.

२. १६ एप्रिलच्या रात्री ८ वाजता ट्रॅक्टरमध्ये भाकर्‍या गोळा करण्यात येत असतांना सिमीचा माजी जिल्हाध्यक्ष आसीफ इक्बाल, अलीम बब्बू, अजीज बब्बू निमकाडीवाले, उर्दू शाळेचा शिक्षक शरीफ मास्टर यांनी ट्रॅक्टर अडवून भाकर्‍या गोळा करणारे हरिदास ढगे, राम वानखेडे, बजरंग दलाचे नंदू दलाल यांच्याशी वाद घातला. त्यानंतर या धर्मांधांनी त्यांना अमानुष मारहाण केली. त्यानंतर त्यांनी दिसेल त्या हिंदूला मारायला प्रारंभ केला. (हिंदूंनो, धर्मांधांचे आक्रमण परतवून लावून स्वतःचे रक्षण करण्यासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात )

३. गावातील महिला भंडार्‍याचा स्वयंपाक करत होत्या तेथपर्यंत हे धर्मांध पोहोचले; मात्र हिंदु तरुणांनी कडे करून भगिनींना संरक्षण दिल्याचे पाहून संतापलेल्या या धर्मांधांनी गावातील मंदिरांना लक्ष्य बनवले.(महिलांचे रक्षण करणार्‍या हिंदु तरुणांचे अभिनंदन ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

४. मजीद भट्टू, ग्रामपंचायत सदस्य शे. सलीम मिस्त्री, शे. मजीद, इलियास बेपारी अडवाणी, अब्दुल रशीद, नसीरखाँ छोटेखाँ हे मंदिरांची तोडफोड करण्यात आघाडीवर होते, असे सांगण्यात आले. (कालपर्यंत पाक, बांगलादेश, काश्मीर, बंगाल, आसाम येथे घडणार्‍या घटना आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातही घडू लागणे, हे त्यांच्या नावाचा जयजयकार करणार्‍या हिंदूंना लज्जास्पद आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

५. धर्मांधांनी पोलिसांवर दगडफेक केली. यात सुभाष वाघमारे, भूषण सोळंके, गजानन नरुटे, कैलास पंडीत, दीपक सपकाळ यांच्यासह पोलीस अधिकारी सोळंके घायाळ झाले. (स्वतःचे रक्षण करू न शकणारे पोलीस हिंदूंचे रक्षण काय करणार ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याचे पाहून अश्रूधूर सोडण्यात आला. त्यानंतर हवेत गोळीबार करण्यात आला.

हिंदूंच्या घरांची लूट, वाहनांची जाळपोळ

मंदिरांची तोडफोड केल्यानंतर धर्मांधांनी हिंदूंच्या घरांना, दुकानांना लक्ष्य केले. विजय राठी यांचे गोदाम पेटवून दिले. या जाळपोळीत गोदामातील साधारण २५ लाख रुपयांचा शेतमाल भस्मसात झाला. गोदामाच्या समोर असलेल्या दोन गाड्या पेटवल्या. भरत गांधी यांची इंडिका कार जाळण्यात आली. विजय कर्हाळे, मधुकर वानखेडे यांचे घर धर्मांधांनी पेटवले. बाळू कुंवर यांच्या किराणा दुकानातील माल लुटला, डॉ. टावरी यांच्या दवाखान्याची तोडफोड केली. गजानन साखरकर यांच्या फर्निचर दुकानातील सर्व फर्निचर लंपास केले. तसेच चप्पल बुटांचे दुकान लुटले, प्रकाश भुतडा यांच्या तीनही दुकानांतील माल लुटून नेला.

शिवसैनिकांचे साहाय्य

धर्मांधांच्या आक्रमणाची माहिती मिळताच शिवसेना खासदार प्रतापराव जाधव, आमदार संजय कुटे, तालुकाप्रमुख संतोष दांडगे, गजानन वाघ यांच्यासह शिवसैनिकांनी रातोरात जामोद गाठले. खासदार जाधव यांनी तातडीने दोषींना बेड्या ठोका नाहीतर आम्हाला शिवसेना पद्धतीने हिसका दाखवावा लागेल, अशी चेतावणी दिली. त्यानंतर पोलिसांनी धरपकड करून ८७ धर्मांधांना कह्यात घेतले. या दंगलखोरांकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रे जप्त करण्यात आल्याची माहिती आहे.

एका रात्रीत मंदिराची भिंत बांधली

जामोद येथे संचारबंदी लागू करण्यात आल्यानंतर धर्मांधांनी सुरुंग लावून बेंबळेश्‍वर मंदिराच्या पाडलेल्या भिंतीची पोलिसांनी एका रात्रीत डागडुजी केली. धर्मांधांनी नासधूस केलेल्या मंदिरांची साफसफाई करून पोलिसांनी काहीच घडले नाही, असे भासवण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे पोलिसांनी १७ एप्रिलला पत्रकारांना जामोदमध्ये प्रवेश नाकारला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात 

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *