Menu Close

गुमला (झारखंड) येथे धर्मांधाकडून अल्पवयीन हिंदु मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे अपहरण

  • मुलीच्या पालकांना धर्मांधाच्या भाऊ आणि वडील यांच्याकडून ठार मारण्याची धमकी

  • १० दिवसांनंतरही पोलिसांकडून कारवाई नाही

‘लव्ह जिहाद’च्या प्रकरणात नेहमीच बोटचेपी भूमिका घेणार्‍या पोलिसांवर कठोर कारवाई झाली पाहिजे !

गुमला (झारखंड) : येथील लक्ष्मण नगरमध्ये इरशाद अंसारी या तरुणाने विवाहाचे आमीष दाखवून १५ वर्षांच्या हिंदु मुलीचे अपहरण केल्याची घटना समोर आली आहे. याविषयी तक्रार करण्यात आल्यावर इरशाद याचा भाऊ अब्दुल आणि वडील यांनी मुलीच्या वडिलांना शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिली. मुलीचे अपहरण झाल्याच्या घटनेला १० दिवस उलटल्यानंतरही पोलिसांकडून मुलीचा शोध लागलेला नाही. यामुळे मुलीच्या पालकांनी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली आहे, तसेच येथील विश्‍व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्याकडून ‘आरोपीवर लवकरात लवकर कारवाई झाली नाही, तर आंदोलन करण्यात येईल’, अशी चेतावणी दिली आहे.

विहिंपचे म्हणणे आहे की, ‘गुमलामध्ये सध्या अशा प्रकारच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. मुसलमान तरुण स्वतःचे हिंदु नाव सांगून हिंदु मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढत आहेत. या विरोधात कठोर कारवाई झाली नाही, तर लव्ह जिहाद आणि धर्मांतर यांविरुद्ध आंदोलन करण्यात येईल.’

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *